रायगडच्या जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांची दीड वर्षात बदली महेंद्र कल्याणकर नवे जिल्हाधिकारी
रायगडच्या जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांची दीड वर्षात बदली महेंद्र कल्याणकर नवे जिल्हाधिकारी राजेश भोस्तेकर

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची दीड वर्षात बदली महेंद्र कल्याणकर नवे जिल्हाधिकारी

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची आयटी विभागात मुंबई येथे प्रशासकीय बदली झाली आहे. रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे.
Published on

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची आयटी विभागात मुंबई येथे प्रशासकीय बदली झाली आहे. रायगडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. निधी चौधरी यांची केवळ दीड वर्षात बदली करण्यात आली आहे. रायगडच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोना काळात चांगले निर्णय घेतले होते.

हे देखील पहा -

त्यामुळे दीड वर्षात निधी चौधरी यांनी आपल्या कामाचा ठसा जिल्ह्यात उमटविला आहे.निधी चौधरी यांनी कोरोना प्रादुर्भाव सुरू होतानाच फेब्रुवारी 2020 मध्ये रायगड जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.

रायगडच्या जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांची दीड वर्षात बदली महेंद्र कल्याणकर नवे जिल्हाधिकारी
बेकायदेशीर बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी पडळकरांवर गुन्हा दाखल

कोरोना संकट त्यानंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, महाड इमारत दुर्घटना, तौक्ते चक्रीवादळ, महाड पूर, दरड दुर्घटना या संकटातही निधी चौधरी यांनी चोख भूमिका बजावली. रायगडकरांच्या विकासासाठी त्यांनी राजकीय रोष पत्करून कामे केली आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या बदलीने एक उत्तम अधिकारी गमावल्याची भावना रायगडकरांना जाणवणार हे नक्की.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com