Raigad: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, अनेक जण अडकल्याची भीती, थरारक VIDEO समोर

raigad boat capsize: रायगड समुद्रामध्ये बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. बोटीमध्ये अनेक खलाशी असून नौदलाकडून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोट बुडत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Raigad: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडिओ समोर
raigad boat capsize Saam Tv
Published On

रायगडच्या समुद्रामध्ये बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या करंजा गावानजीकच्या समुद्र किनाऱ्याजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती नौदलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बोटीवर असलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. या बोटीला अपघात कसा झाला? तसंच त्यावर किती खलाशी होते? याची माहिती अद्याप समोर आली नाही. बोट बुडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ जवान आणि नौदालाच्या गस्त नौकांद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मात्र बोटीला हा अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीत हानी झाली आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. महत्वाचे म्हणजे, वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात आली कशी? ही गुजरातची बोट इथपर्यंत आली कशी? नक्की प्रकार काय आहे? याचा तपास नौदलाकडून केला जात आहे.

Raigad: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडिओ समोर
Raigad Fort : मोठी बातमी! रायगड किल्ल्याच्या पायरी मार्गावरील संरक्षक भिंत कोसळली

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग,कस्टम, पोलिस यांनी सदर घटनेसंदर्भात जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे. ही बोट बुडत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बोटीमध्ये पाणी शिरले त्यानंतर संपूर्ण बोट समुद्रात बुडू लागली. बोट बुडत असल्यामुळे त्यावर असलेल्या सर्व खलाशांनी समुद्रामध्ये उडी मारली. हे खलाशी समुद्रामध्ये पोहत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Raigad: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात बोट बुडाली, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडिओ समोर
Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com