
जळगाव : महाराष्ट्रातील जळगावातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगावातून जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेनंतर ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. ट्रेनमधील प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या. या घटनेत आतापर्यंत ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या अपघाताचा थरार प्रत्यक्षदर्शी प्रवाशानं सांगितला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जळगावमध्ये पुष्पक एक्स्प्रेसचा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती हाती आली आहे. १० ते १२ जण जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचा थरार प्रत्यशदर्शी प्रवाशाने सांगितला आहे.
'पुष्पक एक्स्प्रेस मुंबईला येत असताना दुपारी जळगाव स्टेशनच्या पुढे आणि पाचोराच्या अलीकडे एक्स्प्रेसचा ब्रेक दाबला. ठिणग्या उडाल्या. दरवाजात जे बसले होते, त्यांनी आरडाओरड केली. आग लागली असे जोराने ओरडले. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. दुसऱ्या बाजूने बेंगळुरू एक्स्प्रेस येत होती. त्या एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. ही खूप दुर्दैवी घटना आहे. पुष्पक एक्स्प्रेस आता पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ थांबवण्यात आली आहे', असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी म्हटलं की, 'प्रवासी खाली उतरले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बेंगळुरू एक्स्प्रेसने धडक दिली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. वैद्यकीय मदत पोहोचावी म्हणून स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णवाहिका आणि इतर मदत पोहोचवण्यात आली आहे. या अपघातातील जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय मदत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत'. a
'रेल्वे अपघाताची ही घटना आज बुधवारी संध्याकाळी घडली. मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. सध्या सात ते आठ जणांना इजा झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी डॉक्टर आणि वैद्यकीय पथक पोहोचतील. त्यावेळी सविस्तर माहिती मिळू शकेल', असे त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.