Vasant More : खळखट्ट्याक; डेपोच्या काचा फोडल्या, बसची तोडफोड; ठाकरेसेनेचे वसंत मोरे आक्रमक

Pune Swargate Vasant More Depot Vandalized : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. वसंत मोरे हे स्वारगेट डेपोमध्ये पोहचले असून त्यांनी डेपोची तसेच बसची देखील तोडफोड केली आहे.
Swargate Depot Vasant More vandalized
Swargate Depot Vasant More vandalizedSaamTV
Published On

पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक संतापजनक आणि धक्कादायक घटना पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकील आली आहे. भल्या पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आता या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं पुण्यात प्रकरण चांगलंच तापलं आहे.

याचदरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. वसंत मोरे हे स्वारगेट डेपोमध्ये पोहचले असून त्यांनी डेपोची तसेच बसची देखील तोडफोड केली आहे. पुण्यातील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल, असं देखील वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

Swargate Depot Vasant More vandalized
Pune News : केबिनला दोरी बांधलेली, एन्ट्रीच्या दरवाजाला लॉक नाही; पुण्यातील 'त्या' शिवशाही बसचं धक्कादायक वास्तव समोर

स्वारगेट बस डेपोमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये त्या तरुणीवर अत्याचार झाला, त्या बसबाबत एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. ही शिवशाही बस दुसऱ्या डेपोची आहे, दुसऱ्या ठिकाणाहून ही बस आलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या बसच्या दरवाजाला कुठल्याच प्रकारचं लॉक नाहीय. दरवाजा उघडा असून आतल्या केबिनच्या दरवाजाला देखील लॉक नसून एक दोरी बांधल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

Swargate Depot Vasant More vandalized
Dattatray Gade : पुण्यात तरुणीवर अत्याचार, प्रकरण तापलं; शिरुरमधल्या दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांचे ८ पथक रवाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com