Pune University Girls Hostel : दारुच्या बाटल्या अन् सिगरेटच्या पाकिटांचा ढीग, पुणे विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेमधील प्रकार; PHOTO Viral

Pune University Girls Hostel Alcohol Cigarettes : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहात दारुच्या भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Savitribai Phule University girls hostel Liquor bottles and cigarette packets
Savitribai Phule University girls hostel Liquor bottles and cigarette packetsSaam Tv News
Published On

पुणे : पुणे म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षणाचं माहेरघर. पुणे शहरामध्ये लाखो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन येतात. शहरातील अनेक संस्था या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात, त्यांच्या आयुष्याला दिशा अन् कलाटणी देतात. या शिक्षणसंस्थांपैकीच एक सर्वात नामवंत शिक्षणसंस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. मात्र, सध्या पुण्यातील हे नामवंत विद्यापीठ वेगळ्याच एका कारणाने चर्चेत आलंय. नेमका काय आहे हा प्रकार पाहूया.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहात दारुच्या भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात दारुच्या सिगरेटची पॉकटचे फोटो समोर आले आहेत. वसतिगृहात राहत असलेल्या एखा विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरु यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला.

Savitribai Phule University girls hostel Liquor bottles and cigarette packets
Voter ID: आता मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, बोगस मतदानाला आळा बसणार

धक्कादायक बाब म्हणजे या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत, असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठित करण्याची कुलगुरूंना विनंती करण्यात आलीय. या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात येतेय.

Savitribai Phule University girls hostel Liquor bottles and cigarette packets
Sunita Williams Return : सुनीता विलियम्स अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार, नासाची तयारी पूर्ण, केव्हा होणार लँडिंग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com