Pune News: अगं आई गंsss! मुलाला खाऊ घालत होती, बिबट्याने मुलीवर झडप घातली; आईच्या डोळ्यासमोर फरफटत नेलं

Leopard Attacked On 4 Years Old Girl In Shirur: घराच्या अंगणात आई आपल्या एका मुलाला जेवण भरवत असताना घराजवळ शिकारीच्या हेतूने दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दुसऱ्या मुलीवर अचानक झडप टाकली आणि तिला फरफटत नेले.
Pune News: अगं आई गंsss! मुलाला खाऊ घालत होती, बिबट्याने मुलीवर झडप घातली; आईच्या डोळ्यासमोर फरफटत नेलं
Leopard Attacked On 4 Years Old Girl In ShirurSaam Tv
Published On

पुण्यातील जुन्नर, शिरूरमध्ये बिबट्याची दहशत खूपच वाढली आहे. या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आईच्या डोळ्यासमोरच या ४ वर्षीय चिमुकल्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे ही घटना घडली आहे.

शिरुर तालुक्यात गेल्या दोन महिन्यातली बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. रक्षा अजय निकम असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. घराच्या अंगणात आई आपल्या एका मुलाला जेवण भरवत असताना घराजवळ शिकारीच्या हेतूने दबा धरुन बसलेल्या बिबट्याने दुसऱ्या मुलीवर अचानक झडप टाकत शिकार केली. हा शिकारीचा थरार आईच्या डोळ्यासमोरच घडलाय.

Pune News: अगं आई गंsss! मुलाला खाऊ घालत होती, बिबट्याने मुलीवर झडप घातली; आईच्या डोळ्यासमोर फरफटत नेलं
Pune Water News: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

बिबट्याने चिमुकल्या मुलीला शेतात फरफटत नेले आणि तिला ठार केले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीचा शोध घेतला असता दोन तासांनी मुलीचा मृतदेह सापडला. बिबट्याच्या हल्ल्यात रक्षा निकम या ४ वर्षीय मुलगीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच नागरिकांनी संताप व्यक्त करत बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Pune News: अगं आई गंsss! मुलाला खाऊ घालत होती, बिबट्याने मुलीवर झडप घातली; आईच्या डोळ्यासमोर फरफटत नेलं
Pune News : वाघोली अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, डंपरच्या मालकाला ठोकल्या बेड्या

जुन्नर वनपरिक्षेत्रातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरुर तालुक्यात बिबट्याचे लोकवस्तीतले वास्तव्य दिवसेंदिवस वाढत असताना शिकारीच्या हेतूने बिबटे पाळीव जनावरांसह आता माणसांवरही हल्ले करत आहेत. प्रमुख्याने बिबटे लहान मुलांना लक्ष्य करत असून मागच्या दोन महिन्यात शिरुर तालुक्याच्या पूर्व भागात तीन चिमुकल्या मुलांचा बिबट्याने बळी घेतलाय. तर सहा बिबटे वनविभागाकडून जेरबंद करण्यात आलेत.

Pune News: अगं आई गंsss! मुलाला खाऊ घालत होती, बिबट्याने मुलीवर झडप घातली; आईच्या डोळ्यासमोर फरफटत नेलं
Pune Accident: वाघोलीत अपघात सत्र सुरूच, सलग दुसऱ्या दिवशी डंपरने दुचाकीस्वाराला उडवलं

सध्या या परिसरामध्ये बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडून उपाययोजना व्हायला हव्यात मात्र वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने निष्पाप चिमुकल्याचे बळी जात असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Pune News: अगं आई गंsss! मुलाला खाऊ घालत होती, बिबट्याने मुलीवर झडप घातली; आईच्या डोळ्यासमोर फरफटत नेलं
Pune Bridges: पुण्यातील ओढे-नाले, कालव्यांवरील पुलांचे होणार "स्ट्रक्चरल ऑडीट", सुरक्षेच्या दृष्टिकोनातून होणार पाहणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com