Leopard Attack : भयंकर! आई घरकामात व्यस्त, बिबट्या आला अन् चिमुकल्याला घेऊन गेला; शिरुर तालुक्यातील घटना

Shirur Leopard attack News : मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षीय चिमुकला वंश हा रात्री अंगणात खेळत होता. त्याचे आई-वडील घरकामात व्यस्त होते.
Shirur Leopard attack News
Shirur Leopard attack NewsSaam TV
Published On

शिरुर : अंगणात खेळत असणाऱ्या एका ४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात काल शुक्रवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास घडली. वंश राजकुमार सिंग, असं मृत मुलाचे नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Shirur Leopard attack News
Pimpri Chinchwad News: मालकाचा निष्काळजीपणा, निष्पापाचा जीव गेला! तरुणाचं शीर धडावेगळं झालं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

गेल्या अनेक दिवसापासुन पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याची दहशत आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. पाळीव प्राण्यांसह माणसांवरील दिवसाढवळ्या बिबट्या हल्ले करीत आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी बिबट्यांची टोळकी शिकारीसाठी थेट लोकवस्तीत येत आहेत.

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेकजण बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याने नागरिकांसह पाळीव प्राण्यांचे देखील जीव जात आहे. अगदी ८ दिवसांपुर्वी जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावात बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकला ठार झाला.

या घटनेवरुन नागरिकांनी वनविभागाविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला. ही घटना ताजी असताना मांडवगण फराटा गावात काल शुक्रवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास अशाच प्रकारची एक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षीय चिमुकला वंश हा रात्री अंगणात खेळत होता. त्याचे आई-वडील घरकामात व्यस्त होते. यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.

आरडाओरड होताच चिमुकल्याच्या मानगुटीला पकडून बिबट्याने जवळच्या ऊसाच्या पळून गेला. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला असता, बिबट्याने चिमुकल्याला सोडून दिले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या वंशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत असून वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Shirur Leopard attack News
Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातून थेट लंडनला पोहचले ड्रग्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com