Beed : नसरापूर बालिकेवरील बलात्कार प्रकरणाचे बीडमध्ये पडसाद; संतप्त जमावानं रोखला महामार्ग, वाहतूक ठप्प

Beed News : भोर तालुक्यातील ४ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ परळी वैजनाथ येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. महिलांसह नागरिकांचा तीव्र संताप, प्रशासनावर वाढता दबाव.
PUNE NARSAPUR CASE OUTRAGE: MASSIVE PROTEST AND ROAD BLOCKADE IN PARLI
PUNE NARSAPUR CASE OUTRAGE: MASSIVE PROTEST AND ROAD BLOCKADE IN PARLISaam Tv
Published On
Summary
  • भोरमधील भीषण घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट

  • परळी वैजनाथ येथे नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन

  • महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आणि आक्रमक भूमिका

  • महामार्गावरील वाहतूक ठप्प, पोलिसांचा कडक बंदोबस्त

  • दोषींना कठोर शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात ४ वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या भीषण घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली असून, त्याचे तीव्र पडसाद परळीत उमटले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आज (४ मे) संतप्त नागरिकांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला.शहरातील प्रमुख केंद्र असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात नागरिकांनी एकत्र येत जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला पुण्यातील घटनेचा निषेध करताना महिलांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत "दोषींना तात्काळ फाशीचीच शिक्षा द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. महिलांसोबतच पुरुष आणि तरुणांनीही उपस्थित राहून प्रशासनाचा निषेध केला. रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ शहरातील मुख्य मार्ग आणि महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने तत्काळ मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलन शांततेत पार पडावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क होते.

PUNE NARSAPUR CASE OUTRAGE: MASSIVE PROTEST AND ROAD BLOCKADE IN PARLI
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "ही घटना माणुसकीला लज्जास्पद आहे. जोपर्यंत या प्रकरणातील नराधमांना कठोर कायदेशीर शासन होत नाही, तोपर्यंत जनभावना शांत होणार नाहीत." तसेच, न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.

PUNE NARSAPUR CASE OUTRAGE: MASSIVE PROTEST AND ROAD BLOCKADE IN PARLI
Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून, सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परळीतील या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com