सचिन जाधव
पुणे : परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलांना गंडा घालणाऱ्या नायजेरियन चोरट्यांच्या टोळीतील एकास (Cyber Police) सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चार मोबाइल, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, सीमकार्ड, डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Latest Marathi News)
सायबर पोलिसांनी राॅबिनहूड ओखू (वय ३९, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सोशल मिडीयातून महिलांना (Social Media) मैत्रीची विनंती पाठवून नायजेरियन चोरटे परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी करतात. सोशल मिडीयातून संवाद वाढल्यानंतर चोरटे परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलांंची फसवणूक करायचे.
भेटवस्तूंचे खोकेही ताब्यात
दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने भेटवस्तूंचे खोके ताब्यात घेतले आहे. महागड्या भेटवस्तूंचे खोके सोडविण्यासाठी तातडीने काही (Cyber Crime) रक्कम भरावी लागेल; अशी बतावणी करून चोरटे बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवण्यास भाग पाडायचे. अशा प्रकारच्या गु्न्ह्यात नायजेरियन चोरटे सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.