बारामतीत गावगुंडांची दहशत; तरुणासह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल

Baramati Crime News : बारामतीमध्ये एका तरुणावर आणि त्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याचा व्हिडिओ आरोपींनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Baramati Crime News :
BARAmATI SHOCKER! DEADLY ATTACK ON FAMILY, VIRAL VIDEO CREATES PANIC
Published On
Summary
  • बारामतीत कुटुंबावर कोयता आणि लोखंडी गजांनी जीवघेणा हल्ला.

  • मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

  • पाच आरोपींवर बारामती शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

​बारामती शहरातील खंडोबानगर भागात पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबावर पाच जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. कोयता, लोखंडी गज व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. इतकेच नाहीतर भांडण सोडवण्यास आलेल्या फिर्यादींच्या पत्नीचा विनयभंग या नराधमांनी केला. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.​

विशेष म्हणजे,आरोपींनी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत परिसरात दहशत माजवली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असून पोलिसांचा गुंडांवर धाक उरला आहे की नाही,असा संतप्त सवाल आता बारामतीकर विचारत आहेत. या गुंडांवर पोलीस काय कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baramati Crime News :
Pune Crime News : पुणे तिथं काय उणे! आंब्याचे पैसे कोण देणार? या क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये जोरदार हाणामारी

प्रशांत गोरे, आर्यन गोरे, गौरव गोरे, श्रवण गोरे आणि ऋषिकेश गुळवे अशी हल्लेखोरांची नावे आहेत. या हल्लेखोरांनी खंडोबानगर भागात राहणाऱ्या नकुल वाल्मीकी नावाच्या तरुणावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. नकुल वाल्मीकी (वय २४) व त्यांच्या कुटुंबीयांवर प्रशांत गोरे, आर्यन गोरे, गौरव गोरे, श्रवण गोरे आणि ऋषिकेश गुळवे यांनी कोयता, लोखंडी गज व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला.भांडण सोडवण्यास आलेल्या फिर्यादींच्या पत्नीचा विनयभंगही करण्यात आला.याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.​

Baramati Crime News :
भयंकर! आदल्या दिवशी माय-लेकीला फिरायला नेलं, दुसऱ्या दिवशी जीव घेतला, क्रूर बापाच्या कृत्याने कल्याणमध्ये खळबळ

नागपुरात रक्तरंजित थरार! गमती-जमतीनंतर चाकू भोसकला

उमरेड शहरातील कावरापेठ परिसरात एका तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव राजकुमार मारोती पवार असे आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोहेल ऊर्फ जॉनी शाहिद शेख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येची घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. कावरापेठ येथील नगर परिषद दुर्गापूर प्राथमिक शाळेजवळील पानटपरीसमोर हत्याकांड घडला. राजकुमार पवार हे त्यांचे मित्र जमिल शेख आणि अन्य एका व्यक्तीसोबत पानटपरीसमोर उभे होते. त्यावेळी आरोपी सोहेलनं चाकूने त्यांच्यावर हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com