Pune News: अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या दौऱ्यावेळी खळबळजनक घटना; स्मशानभूमीतच पुणे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

यावेळी किरकोळ वादातून उपअभियंताने थेट पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला काठीने मारहाण आणि शिवीगाळ केली आहे.
Pune News
Pune NewsSaam TV

अक्षय बादवे

Pune News: गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्हीआयपी दौऱ्यावेळी पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी किरकोळ वादातून उपअभियंताने थेट पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला काठीने मारहाण आणि शिवीगाळ केली आहे. (Latest Marathi News)

या बाबत अधीक माहिती अशी की, अभियंता श्रीनिवास कंदुल आणि उपअभियंता ललित बोडे यांच्यात हा वाद झाला आहे. विश्रामवाडा क्षेत्रीय अंतर्गत वैकुंठ स्मशानभूमी या दोघांमध्ये हाणामारी झालीये. वैकुंठ स्मशानभूमी येथे आरएसएसचे मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार होते.

Pune News
Andheri Crime News: पत्नी-पत्नीचे एकांतातील फोटो कॅमेऱ्यात कैद; व्हायरल करण्याची धमकी अन्... पुढे काय घडलं?

अंत्यसंस्कारावेळी अमित शहा (Amit Shaha) आणि मोहन भागवत (Mohan Bhagwat) दोघेही उपस्थित राहणार असल्याने परिसरातील डागडुजी, आणि स्वच्छता करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने सूचना दिल्या होत्या. यावेळी संतापलेल्या उपअभियंताने थेट शिवीगाळ करत वरिष्ठ अधिकाऱ्याला काठीने मारहाण केली.

याप्रकरणी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांनी परस्परांविरोधात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे महानगरपालिका परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune News
Mumbai Crime News: धावत्या लोकलमध्ये तृतीयपंथीयाचं महिलेसोबत धक्कादायक कृत्य; वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com