Mumbai Crime News: धावत्या लोकलमध्ये तृतीयपंथीयाचं महिलेसोबत धक्कादायक कृत्य; वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल

Mumbai Local Train Crime News: तृतीयपंथीयाने महिलेला स्पर्श करून अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेने वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Mumbai Crime News Woman passenger molested by third gender in local train case registered in Bandra police
Mumbai Crime News Woman passenger molested by third gender in local train case registered in Bandra police Saam TV
Published On

Mumbai Local Train Crime News: रेल्वे प्रवासादरम्यान महिला डब्यात चढून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयास प्रवासी महिलेने पैसे न दिल्यामुळे चिडलेल्या तृतीयपंथीयाने महिलेला स्पर्श करून अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेने वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून वांद्रे रेल्वे पोलिसांनी तृतीयपंथीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime News Woman passenger molested by third gender in local train case registered in Bandra police
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा ब्लॉक; 'या' वेळेत प्रवास टाळा, कारण काय?

शिवन्या सारला उर्फ कौशल्या (वय 24 वर्ष) असं गुन्हा दाखल झालेल्या तृतीपंथीचे नाव आहे. पोलिसांनी कलम 41 (अ ) (1) प्रमाणे तृतीयपंथीस नोटीस दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी एक 44 वर्षीय महिला प्रवासी मरीन लाइन्स स्थानकातून अंधेरीला जाण्यासाठी बोरीवली ट्रेनने प्रवास करीत होती.

फिर्यादी या महिला डब्यातून प्रवास करत असताना लोकल माहीम स्थानकातून सुटल्यानंतर साधारणपणे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तृतीयपंथीयाने फिर्यादी यांच्या जवळ येऊन पैसे मागण्यासाठी हाताने स्पर्श केला. हात लावू नको, तू स्त्री आहे की पुरुष असे म्हणत फिर्यादीने त्या तृतीयपंथीयास दूर करण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Crime News Woman passenger molested by third gender in local train case registered in Bandra police
Maharashtra Weather News: राज्यासाठी पुढील ३-४ तास महत्वाचे; मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार पाऊस

दरम्यान, पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करत परिधान केलेली साडीवर केली. त्यामुळे फिर्यादी महिलेने सांताक्रूझ रेल्वे स्थानकात उतरून आरोपी तृतीयपंथी विरोधात पोलीस अंमलदाराकडे तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस अंमलदार यांनी फिर्यादी व आरोपी तृतीयपंथीस वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात हजर केले.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वांद्रे रेल्वे पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी व्यक्ती गुन्ह्याच्या पुढील तपासात सहकार्य करील याची खात्री झाल्याने प्रत्यक्षात अटक न करता फौ. प्र. स. कलम 41 (अ ) (1) प्रमाणे नोटीस दिली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com