भीमाशंकर मार्गावर भीषण अपघात; पोखरी घाटात कार 200 फूट खोल दरीत कोसळली, दोघांचा मृत्यू

Horrific Accident Near Bhimashankar: भीमाशंकर मार्गावरील पोखरी घाटात एक दुर्दैवी अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन जणांचा मृ्त्यू झालाय. तर चार जण गंभीर जखमी झालेत.
Bhimashankar road accident two people killed in Pokhari Ghat
Bhimashankar road accident two people killed in Pokhari Ghatsaam tv
Published On: 
Summary
  • भीमाशंकरकडे जाणाऱ्या पोखरी घाटात भीषण कार अपघात झाला.

  • नागमोडी वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने इको कार थेट दरीत कोसळली.

  • या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले.

रोहिदास गाडगे, साम प्रतिनिधी

भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावर पोखरी घाटात भीषण अपघाताची घटना घडलीय. पोखरी घाटातील नागमोडी वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट २०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

Bhimashankar road accident two people killed in Pokhari Ghat
Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! देवीची मूर्ती नेताना पिकअपला ट्रकची धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, इको कारमधून तीन महिला आणि तीन पुरुष असे एकूण सहा जण प्रवास करत होते. भीमाशंकरकडे जात असताना पोखरी घाटातील नागमोडी वळणावर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दरीत कोसळली. या अपघाताची तीव्रता मोठी असल्याने कारमधील प्रवाशी जखमी झालेत.

गंभीर जखमींची नावे

1) कांचन संदीप केंगले– ३५/महिला

2) योगेश देवराम भांगे– २६/पुरुष

3) शिवाजी मारुती डामसे – ६०/ पुरूष

4) समुद्री प्रमोद केगले – ४०/ महिला

मृतांची नावे

1) ज्ञानेश्वर गोविंद गवारी – ४१/ पुरुष (ढगेवाडी) ड्रायव्हर

2) महिला – ओळख पटलेली नाही.

Bhimashankar road accident two people killed in Pokhari Ghat
स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात; दोन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांची धडक, ४६ जणांचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आलं. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर चार जखमींना तातडीने उपचारासाठी घोडेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या भीषण अपघातामुळे भीमाशंकर मार्गावरील घाटरस्त्यांवरील प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com