
पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजे जेजुरीमध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे. पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की, या भांडाऱ्यामुळे जेजुरीनगरी अक्षरशा सोन्यासारखी पिवळी होते, आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं. मात्र, हाच पिवळा भंडारा आता जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय. या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आलंय.
ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय. त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी, अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थांचे माजी मुख्यविश्वस्त शिवराज झगडे यांनी केलीय. याबाबतचं एक निवेदन त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिलंय, आणि ही भेसळ थांबण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केलीय.
या सोनपिवळ्या भंडाऱ्यामुळेच 'सोन्याची जेजुरी' हे नाव प्रचलित झालंय. मंगलकार्यात हळद ही भाग्याची तर कुंकू सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागलंय. 'यलो पावडर' म्हणजेच 'नॉन ईडीबल' टरमरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा विकला जातोय. यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर याची विक्री होतेय. या भंडाऱ्यामुळे त्वचेची आग होणे, डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या जाणवत आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे भेसळयुक्त भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असल्याचा अहवाल, मागील काळात पुरातत्व खात्यानं दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गेली अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. याबाबत देवसंस्थानचे माजी प्रमुखविश्वस्त शिवराज झगडे, पत्रकार प्रकाश फाळके यांनी मुंबईत अन्न व औषध भेसळ प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेत यावर शासनाकडून निर्णय घेत ठोस उपाययोजना करावी, अशी विनंती केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.