

ज्ञानेश्वर चौतमल, साम टिव्ही-पुणे
Pune News: पुण्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवाजीनगर राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाच्या टँकरचा अपघात झाला आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दुधाचा टँकर पलटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दूध आणि ऑईल सांडले आहे. सद्यस्थितीत या भागात वाहने चालविताना विषेश काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात वाहन चालक जखमी झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या वाहनचालकावर उपचार सुरू आहेत.
दूधाचा टँकर (Milk Tanker) पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणावर दूध वाया गेले आहे. तसेच अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून दूधाचा टँकर बाजूला करत वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यातील रस्ते अपघातात रोज एकाचा बळी
पुण्यात दिवसाला ३ अपघात होत आहेत. यात एकाचा मृत्यू आणि दोन जखमी अशी संख्या समोर येतेय. गेल्या दीड वर्षांतील पुण्यातील रस्ते अपघाताची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे.
अपघाताची वाढती संख्या
वर्षे २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत
एकूण अपघात ८७२ ६३८
गंभीर जखमी ५०७ ३७९
किरकोळ जखमी १०१ ७८
मृत्यू ३२५ २०२
पादचाऱ्यांचे अपघात
वर्ष २०२२- २०२३ जुलैपर्यंत
एकूण अपघात २५७ १७७
गंभीर जखमी १४२ १०८
किरकोळ जखमी १६ २३
पादचाऱ्यांचा मृत्यू १११ ६३
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.