Pune News: पुणेकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यातील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. येथे दिवसाला ३ अपघात होत आहेत. यात एकाचा मृत्यू आणि दोन जखमी अशी संख्या समोर येतेय. गेल्या दीड वर्षांतील पुण्यातील रस्ते अपघाताची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. (Latest Marathi News)
दीड वर्षात ५२७ जणांचा मृत्यू
गेल्या दीड वर्षांत रस्ते अपघातात आतापर्यंत ५२७ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सार्वजनिक वाहतुकीपेक्षा नागरिक खाजगी वाहतूक जास्त निवडतात. पुण्यामध्ये सध्या ३६ लाख वाहने आहेत. त्यापैकी २४ लाख ८६ हजार दुचाकी आहेत. वाहन खरेदीत दुचाकी खरेदीची संख्या सर्वाधिक आहे. खाजगी वाहने वाढल्याने ट्राफीक ही पुण्यातील मोठी समस्या असून आता अपघाताची संख्या देखील वाढतच चालली आहे.
पुणे शहरात साल २०२२ मधील अपघाताची संख्या एकूण ८७२ इतकी आहे. यामध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या ३१५ तर मृतांची संख्या ३२५ इतकी आहे. यंदा साल २०२३ मध्ये जुलैपर्यंत ६३८ अपघात झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये प्राणांतिक अपघात १९३ आहेत. तसेत यात २०२ जणांचा मृत्यू झाल आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत चाचली आहे. दुचाकीस्वारांचे सर्वाधित अपघात होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करूनही अपघाताची संख्या वाढतच चालली आहे.
अपघाताची वाढती संख्या
वर्षे २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत
एकूण अपघात ८७२ ६३८
गंभीर जखमी ५०७ ३७९
किरकोळ जखमी १०१ ७८
मृत्यू ३२५ २०२
पादचाऱ्यांचे अपघात
वर्ष २०२२- २०२३ जुलैपर्यंत
एकूण अपघात २५७ १७७
गंभीर जखमी १४२ १०८
किरकोळ जखमी १६ २३
पादचाऱ्यांचा मृत्यू १११ ६३
अपघाताची कारणे काय?
पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. याला मुख्य कारण म्हणजे बेशिस्त आणि चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे.
ट्रिपल सीट दुचाकी चालकांची संख्या वाढली आहे. अनेक जण मुद्दामुन हेल्मेट घालणे टाळतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याने देखील अपघाताच्या घटना घडतात.
गर्दीच्या ठिकाणी वाहनाचा वेग नियंत्रीत असावा लागतो. वेग नियंत्रीत नसेल तर वाहनावरील ताबा सुटून देखीव अपघात घडतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.