Bus Fire IN Palghar: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या बसने घेतला अचानक पेट; सर्व प्रवासी थोडक्यात बचावले

Bus Fire IN Palghar: पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरावरील चिंचपाडा येथे खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
Bus Fire IN Palghar
Bus Fire IN PalgharSaam tv
Published On: 

Palghar News: पालघरमधून मोठी बातमी हाती आली आहे. पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरावरील चिंचपाडा येथे खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या बसला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून बस जळून खाक झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा येथे खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही खासगी बस प्रवाशांनी भरलेली होती. प्रवाशांनी भरलेल्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

Bus Fire IN Palghar
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अलिशान कारचा भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, चिमुकली थोडक्यात बचावली

पालघरमध्ये बसला लागलेल्या आगीत सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत खासगी बस जळून खाक झाली आहे. तर सर्व प्रवाशांकडील असलेल्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तर बसला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Bus Fire IN Palghar
Bhiwandi News: भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

नागपुरात शिवशाही बसनेही घेतला होता अचानक पेट

दरम्यान, धावत्या वाहनांना आग (Fire) लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे . काही दिवसांपूर्वी नागपूरमध्येही शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली होती. नागपूरमध्ये भररस्त्यात शिवशाही बसने पेट घेतला होता.

या दुर्घटनेत १६ प्रवासी थोडक्यात बचावले होते. या आगीत शिवशाही संपूर्ण जळून खाक झाली होती. वारंवार वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com