Republic Day 2024: राज्यातील १८ पोलीस जवानांना शौर्य पदक; तर ४० पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक

Republic Day Awards: भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.
Republic Day Awards
Republic Day AwardsSaam Tv
Published On

Republic Day Awards:

भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलिस अधिकाऱ्यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत 40 पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन सेवेसाठी, सात पदके गृहरक्षक आणि नागरी संरक्षण, तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ कारागृह अधिकाऱ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील एकूण 78 पोलिस अधिकाऱ्यांना तर सहा अग्निशमन विभागातील सहा अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Republic Day Awards
Emmanuel Macron: इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पंतप्रधान मोदींनी दिली खास भेट, पाहा VIDEO

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या यादीत चार श्रेणींमध्ये पुरस्काराची घोषणा झाली आहे. यात, दोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ (पीएमजी), 275 पोलीस अधिकाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ (जीएम) तर विशिष्ट सेवेकरिता 102 ‘राष्ट्रपती पदक’ (पीएसएम) तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 753 पदके जाहीर झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण 84 पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सहा अग्निशमन सेवेसाठी सहा पदकांचाही समावेश आहे.  (Latest Marathi News)

यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या पदकांच्या नुकत्याच झालेल्या पुनर्रचनेनंतर, प्रजासत्ताक दिन 2024 निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत.

Republic Day Awards
Ajit Pawar Group: शरद पवार गटाला मोठा धक्का, आणखी एका आमदाराने अजित पवार गटाला दिला पाठिंबा

विविध पदकांचा सन्मान करण्यासाठीची संपूर्ण पदक व्यवस्था तर्कसंगत करण्यासह त्यात परिवर्तन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असल्याने, या अनुषंगाने, सोळा शौर्य/सेवा पदके (पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेसाठी) तर्कसंगत करण्यात आली असून चार पदकांमध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG), शौर्य पदक (GM), विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) जाहीर करण्यात या श्रेणींमध्ये विलीन करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com