
अक्षय बडवे, साम टीव्ही
पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात कारवाईची मागणी जोर धरताना दिसते आहे. मात्र, या घटनेला आठवडा उलटून गेला तरी केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस कारवाईची चिन्हं दिसत नसल्याने संताप वाढत आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 'डोनाल्ड ट्रम्प जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत भारत कारवाई करणार नाही का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आंबेडकर म्हणाले, 'डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार जेसन मिलर यांची नेमणूक पाकिस्तानविरोधी लॉबिंगसाठी करण्यात आली आहे. त्यांना सुमारे १.५० लाख डॉलर दिले जाणार आहेत', असा आरोप त्यांनी केला.
यावेळी आंबेडकर यांनी भाजपाला थेट प्रश्न विचारला, 'जेसन मिलर यांना तुम्ही नेमलं आहे का? आणि त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे का?'असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आंबेडकरांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, 'युनायटेड नेशन्सने कारवाई रोखण्याची भूमिका घेतली असतानाच आता लॉबिंग सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने चार दिवसांपूर्वीच या संदर्भातील माहिती दिली होती, तेव्हा भारताने अजून यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली नव्हती. आता मात्र पाकिस्तानमधील अनेक यूट्यूब चॅनेल्स बंद झाले आहेत', असं आंबेडकर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.