Laxman Hake : बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

baramati News : बारामतीत ओबीसी समाजाकडून हैद्राबाद गॅझेट विरोधात मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नव्हती. या विनापरवानगी मोर्चामुळे लक्ष्मण हाकेसह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Laxman Hake : बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
baramati newsSaam Tv
Published On
Summary
  • बारामतीत विनापरवानगी ओबीसी मोर्चा काढला गेला

  • लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल

  • पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती

  • समाजात संताप आणि आंदोलनाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध म्हणून ओबीसी समाजाकडून मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पाच सप्टेंबर रोजी बारामती येथे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती. पोलिसांची परवानगी नसूनही लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चा काढल्याने त्यांच्यासहित १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळलेल्या माहितीनुसार, हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. शारदा प्रांगणापासून ते प्रशासकीय भवनापर्यंत हा मोर्चा निघाला. या वेळी अंदाजे दीड ते दोन हजार लोक जमले होते आणि घोषणाबाजी करत सरकारविरोधी नाराजी व्यक्त करण्यात आली.

Laxman Hake : बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गेवराईत गुन्हा दाखल

सुरक्षेच्या कारणास्तव या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र ओबीसी नेत्यांनी नियमांचे पालन न करत मोर्चा काढला. या घटनेनंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत लक्ष्मण हाकेंसह एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून मोर्चा काढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आरोपींमध्ये लक्ष्मण हाके यांच्यासह चंद्रकांत वाघमोडे, अमोल सतकर, पांडुरंग मेरगळ, नवनाथ पडळकर, किशोर मासाळ, गोविंद देवकाते, किशोर हिंगणे, बापूराव सोलनकर, विठ्ठल देवकाते, काळुराम चौधरी, बापू कवले, मंगेस ससाणे आणि जी. बी. गावडे यांचा समावेश आहे.

Laxman Hake : बारामतीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Laxman Hake : अजित पवार, तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता, अधिकाऱ्याला दम देणं... लक्ष्मण हाकेंचा घणाघात

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद सण होता, तर ६ सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि ९ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची मिरवणूक होती. या पार्श्वभूमीवर मोठा जमाव जमल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या भीतीने परवानगी नाकारली होती. परंतु, आदेश धाब्यावर बसवत मोर्चा काढण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com