Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीला कोणाचा ब्रेक? मातोश्रीला कधी देणार शिवतीर्थ प्रतिसाद ? वाचा सविस्तर

uddhav thackeray and aaditya thackeray : ठाकरे ब्रँड जपण्यासाठी खरचं ठाकरे बंधू एकत्र येतील का? आदित्य ठाकरेंनी युतीला हिरवा कंदील दाखवलाय. मात्र अद्याप राज-उद्धव यांची युती का रखडली? मनसेची युतीवर प्रतिक्रिया काय?... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Raj and Uddhav Thackeray news news
Raj and Uddhav ThackeraySaam Tv News
Published On

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा अधूनमधून सुरूच असते. साद-प्रतिसाद, परदेशवारी आणि नंतर युतीसंदर्भात बोलण्यास मनसे नेत्यांना मनाई...इथून पुढे दोन ठाकरें बंधू एकमेकाशी चर्चा करणार का याबद्दल सगळ्यांची उत्सुकता कायम ठेवत दोन्ही पक्षांचे नेतेच यासंदर्भात विधान करताना दिसत आहेत. यावेळी मात्र आदित्य ठाकरेंच्या विधानानं युतीच्या थंडावलेल्या चर्चांना पुन्हा उधाण आलयं.

दरम्यान मनसे नेते प्रकाश महाजनांनी तर आदित्य ठाकरेंना शिवतीर्थावर येऊन युतीच्या प्रस्ताव देण्याचा सल्ला दिलाय. मात्र आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा कधीकधी झाल्या? पाहूयात..

Raj and Uddhav Thackeray news news
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मिळाले का? जाणून घ्या चेक करण्याचे ४ सोपे मार्ग!

ठाकरेंच्या युतीचं 'राज' गुलदस्त्यात

18 एप्रिल 2025

शिवसेना सोडल्याच्या 19 वर्षांनी राज ठाकरेंच मुलाखतीतून साद घातली

19 एप्रिल 2025

उद्धव ठाकरेंकडून युतीच्य़ा प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद

20 एप्रिल 2025

राऊतांनी युतीच्या चर्चेसाठी कुठलीच अट नसल्याचं सांगितलं

21 एप्रिल 2025

राज ठाकरेंकडून मनसैनिकांना चर्चा करण्यास मनाई

22 एप्रिल 2025

उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले

30 एप्रिल 2025

दोन्ही ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावरून परतले

13 मे 2025

शिंदे सेनेचे नेते ठाकरेंच्या भेटीला

16 मे 2025

राज ठाकरेंचे युतीच्या भरवशावर न राहण्याचे आदेश

23 मे 2025

मनसेसोबत युतीसाठी आम्ही सकारात्मक, राऊतांचे विधान

4 जून 2025

ठाकरे बंधूंची युती झाल्यास स्वागतच- आदित्य ठाकरे

Raj and Uddhav Thackeray news news
Shocking : हृदयद्रावक! हवेत फेकलेलं बाळ जन्मदात्या बापाच्या हातातून निसटलं; डोक्यावर आपटून चिमुकल्याचा मृत्यू

साद, प्रतिसादानंतर शिंदेंच्या नेत्यांची शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट... असा हा युतीच्य़ा चर्चांचा प्रवास नेमका कुठल्या वळणावर थांबलाय. हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊ असं म्हणणाऱ्या ठाकरे बंधूंना युतीसाठी नेमकं कुणी रोखलयं, ठाकरे ब्रँड संपणार नाही, असं जाहिरपणे म्हणणारे ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड जपण्यासाठी पालिका निवडणुकीआधी कोणता निर्णय घेतात? हे पाहणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com