

Navi Mumbai News : गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे जीव गेले. मात्र पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी धावलेल्या एका कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
विशाल राजवाडे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. विशाल हे उरण पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत होते. एपीआय विशाल राजवाडे यांचं कर्तव्यांवार असताना निधन झालं आहे. (Latest Marathi News)
विशाल राजवाडे हे रात्रभर उरण भागातील चिरनेर परिसरात पुरग्रस्तांना मदत करत होते. चिरनेर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी स्वतः फिल्डवर उतरून विशाल राजवाडे हे पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होते. त्याचवेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांच्या मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस दलात (Police) हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस परिवार या संस्थेनं घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. त्यानंतर तातडीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांना फोन केला. विशाल राजवाडे यांचा कर्तव्यावार असताना मृत्यू झाला आहे, जेवढी शक्य असेल तेवढी मदत त्यांच्या कुटुंबियांना करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. (Breaking Marathi News)
तसेच अनुकंपतत्वावर कुटुंबियांतील व्यक्तीला घेण्यात येऊ शकतं का? यासाठी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. झालेली घटना वेदनादायी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.