Crime News : सोलापूर हादरलं! अल्पयवयीन मुलीसोबत घडला भयंकर प्रकार; क्रूर कृत्यानंतर तरुणीची बोटही छाटली

अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरुन अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे.
 Police
PoliceSaam Tv

सोलापूर : अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरुन अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. आरोपींनी पीडित मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने वार केले. या हल्ल्यात या नराधमांनी मुलीची दोन बोटं छाटल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय आणि नामदेव अशी आरोपींची नावं आहेत. या दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी 6 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर 5 मार्च रोजी याच दोन आरोपींनी अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीने आरोपींविरोधात 5 मार्च रोजी बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 Police
Wardha Crime: भामट्यांचा अजब कारनामा! घरातून काढला सोन्याने भरलेला हंडा, त्यात निघाले...

दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याच गुन्ह्याच्या तपास कामाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई-वडील हे संध्याकाळी पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा रात्री आठच्या सुमारास आरोपी अक्षय माने आणि सिद्धेश्वर दळवी हे पीडितीचे घरी आले.

हातात असलेल्या सत्तूर आणि कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि कपाळाला दुखापत झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे हल्ल्यात तिच्या उजव्या हाताची दोन बोटं देखील तुटली आहेत.

या हल्ल्यानंतर पीडित मुलगी ही बेशुद्ध झाली. तिला बेशुद्ध अवस्थेतच बार्शीतल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या गंभीर प्रकारांनंतर आरोपी अक्षय आणि सिद्धेश्वर यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम 307, 324, 326, 34, 452, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,याप्रकरणी सोलापूर (Solapur) पोलीस अधीक्षकांकडून संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. बार्शी तालुका ठाण्यातील एपीआय, शहर ठाण्यातील महिला पीएसआय, 2 पोलीस हेड कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल करूनही वेळेत आरोपींना अटक न करणे हे पोलीस अधिकाऱ्यांना भोवले आहे.

एपीआय महारुद्र परजणे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे डब्ल्यू पीएसआय सारिका बजरंग गुटकुल, हेड कॉन्स्टेबल अरुण भगवान माळी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

 Police
Maharashtra Politics : बागेश्वर धामच्या भोंदू बाबाला भाजपचा पाठिंबा? काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

आता संजय राऊंतांच्या (Sanjay Raut) ट्विटने याला राजकीय वळण प्राप्त झालं आहे. संजय राऊतांनी अत्याचार करणारे भाजप पुरस्कृत गुंड असल्याचा आरोप केला आहे. अत्याचार करणाऱ्यांना तीन महिन्याच्या आत शिक्षा द्या. अन्यथा इच्छामारणाची परवानागी द्या, पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com