Akola News : संतापजनक! अकोल्यात 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; 24 वर्षीय तरुणाला अटक

Akola Crime News : घरात कुणी नसल्याची संधी साधत एका 24 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही, तर पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली.
Akola Crime News
Akola Crime News Saam TV
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना अकोला शहरातील अशाच प्रकारची घटना घडली. घरात कुणी नसल्याची संधी साधत एका 24 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही, तर पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Akola Crime News
Badlapur News : बदलापूर घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; चामटोली गावातून २१ वर्षीय तरुणीला अटक

यश (वय 24) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो शहरातील वल्लभनगर (Akola News) येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अत्याचाराच्या या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील तक्रारदार कुटुंब काही कामानिमित्त शहरातील वल्लभनगर येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे आलं होतं.

त्यांच्यासोबत 10 वर्षांची मुलगी देखील होती. दरम्यान, शहरात महत्वाचे काम असल्याने मुलीच्या आई-वडिलांनी तिला नातेवाईकाच्या घरी ठेवले. त्याचवेळी आरोपी यश हा घरात होता. त्याचे आई-वडीलही कामानिमित्त बाहेर गेल्याने यशची नियत फिरली.

याच संधीचा फायदा घेत आरोपीने अत्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Crime News) केला. यासंदर्भात कुणालाही सांगितल्यास आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, आई-वडील काम आटोपून घरी परतल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

मुलीवर अत्याचार झाल्याचं समजताच आई-वडिलांनी तातडीने अकोट फैल पोलीस स्टेशन गाठलं. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. SDPO कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात हा गुन्हा दाखल झालाय.

Akola Crime News
Pune Crime News : पुण्यात रक्तरंजित थरार, भररस्त्यात सराईत गुन्हेगाराची हत्या; तिघांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com