साहित्य क्षेत्रावर शोककळा, कवी सतीश काळसेकरांचं निधन...(पहा व्हिडीओ)

प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांचं पेण मध्ये निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
साहित्य क्षेत्रावर शोककळा, कवी सतीश काळसेकरांचं निधन...(पहा व्हिडीओ)
साहित्य क्षेत्रावर शोककळा, कवी सतीश काळसेकरांचं निधन...(पहा व्हिडीओ)Saam Tv
Published On

प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर Satish Kalsekar यांचं पेण Pen मध्ये निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. "वाचणाऱ्याची रोजनिशी" या पुस्तकाबद्दल त्यांना 2013 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

इंद्रोपयोग, निषद, साक्षात आणि विलामधीत या त्यांच्या कविता प्रसिद्ध होत्या. सतीश काळसेकर यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. लेखक वाचकांमधील दुआ हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

वेंगुर्ल्यातील काळसे या गावात काळसेकर यांचा जन्म झाला होता. सिंधुदुर्गातच त्याचं शालेय शिक्षण झालं होत. तर मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होत. त्यानंतर काही काळ त्यांनी ज्ञानदूत व टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी केली होती. काव्य लेखनातून वाङ्‌मयीन कारकिर्दीला काळसेकर यांची सुरुवात झाली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com