Railway Projects : कल्याण- बदलापूर, कल्याण - कसारा नव्या मार्गिका, महाराष्ट्रासाठी मोदींचे मोठं गिफ्ट, काय काय मिळाले?

Maharashtra railway projects : पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी ₹१.७३ लाख कोटींची गुंतवणूक मंजूर केली. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसाठी नवीन प्रकल्प, मार्गिका आणि बुलेट ट्रेनला चालना.
PM Modi
PM Modi saam Tv
Published On

Gondia Ballarshah doubling project : केंद्रातील मोदी सरकारनं महाराष्ट्राच्या झोळीत भरभरून निधी दिला आहे. विशेषतः अनेक रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी मोठी तरतूद केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याण-आसनगाव चौथ्या मार्गिकेला मान्यता दिली आहे. तसंच मुंबई उपनगरीय रेल्वेवर दोनशेहून अधिक एसी लोकल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यंत जिकीरीच्या झालेल्या उपनगरीय रेल्वे प्रवास सुकर होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला जातोय. पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोंदिया-बल्लारशाह डबलिंग या २४० किमीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प अंदाजे ४८१९ कोटी रूपयांचा असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

PM Modi
Railway Project : एसी लोकल ते कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, महाराष्ट्रासाठी रेल्वेच्या महत्वाच्या घोषणा

गोंदिया-बल्लारशाह प्रोजेक्टमुळे विदर्भ, मराठवाडा कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. याचा विदर्भाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बुलेट ट्रेन,कॉरिडोर, रेल्वे स्टेशन पुनर्विकास, नव्या मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे प्रजोक्टसाठी एकूण गुंतवणूक १ लाख ७३ हजार ८०४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पाडली. यामध्ये महाराष्ट्राला रेल्वे आणि केंद्राकडून मिळालेल्या नव्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी अनेक रेल्वे प्रोजेक्टला मान्यता दिली आहे. रेल्वे प्रोजेक्ट्सला मान्यता देण्यासाठी दरवर्षी निधी हवा आहे. या वर्षी बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी २३७७८ कोटींची तरतूद केली आहे. यूपीएची सत्ता होती तेव्हा फक्त ११७१ कोटींचा रेल्वे बजेट मिळत होता. आता मोदींच्या कार्यकाळात त्यात २० पटीनं वाढ झाली आहे, असेही रेल्वेमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.

PM Modi
Nashik-Mumbai Railway: गुड न्यूज! नाशिक-मुंबई रेल्वे प्रवास होणार सुसाट; नवीन रेल्वे लाईन होणार सुरू, प्रवासाचा वेळ १ तासाने वाचणार

महाराष्ट्रासाठी काय काय?

अजिंठा लेणीला कनेक्ट करण्यासाठी जालना -जळगाव रेल्वे - ७१०६ कोटी रुपयांची मान्यता

मनमाड- इंदूर - १८ हजार कोटींची मान्यता

मनमाड-जळगाव चौथी मार्गिका - २७०० कोटी मान्यता

भुसावळ-खंडवा चौथी मार्गिका

गोंदिया - बल्लारशहा डबलिंग- ४८०० कोटी रुपये

मुंबईमधील रेल्वे प्रोजेक्ट वेगाने होत आहेत.

सीएसएमटी-कुर्ला सहावी मार्गिका

मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका

हार्बर लाइनचा गोरेगाववरून बोरिवलीपर्यंत विस्तार होणार

बोरिवली-विरार सहावी मार्गिका

विरार - डहाणू रोड - तिसरी आणि चौथी मार्गिका

पनवेल- कर्जत उपनगरीय कॉरिडोर

ऐरोली- कळवा उपनगरीय कॉरिडोर लिंक

कल्याण - आसनगाव चौथी मार्गिका

कल्याण- बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका

कल्याण - कसारा तिसरी मार्गिका

निलजे- कोपर डबल लाइन

PM Modi
Missing Link Project : महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट! मुंबई- पुण्याला जोडणार तरंगणारा ब्रिज; या तारखेला सुरु होणार मिसिंग लिंक

मुंबईसाठी १७ हजार कोटींचे प्रोजेक्ट सुरू आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागासाठी अनेक प्रोजेक्ट आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात वेगाने रेल्वे जाळे वाढणार आहे. मुंबईमध्ये एसी लोकलची संख्या अणखी वाढणार आहे. तब्बल २३८ नव्या एसी लोकलची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे. या लोकल मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहितीही देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com