Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून लाखो रुपयांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळी ताब्यात

Pimpri Chinchwad News : ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या फसवणुकीच्या प्रकारात प्रामुख्याने गुंतवणूक करण्याचे सांगत यातून जादा परतावा देण्याचे आमिष दिले जाते. यातून फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटच्या बनावट ॲपमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अशा प्रकारे आर्थिक गंडा घालणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या फसवणुकीच्या प्रकारात प्रामुख्याने गुंतवणूक करण्याचे सांगत यातून जादा परतावा देण्याचे आमिष दिले जाते. यातून फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Pimpri Chinchwad News
Maharashtra weather : सावधान! सोसाट्याचा वारा अन् वि‍जांचा कडकडाट, ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

फसवणूक करणारे चौघे ताब्यात 
धाराशिव, लातूर आणि जयपुर शहरात जाऊन सायबर पोलिसांनी शेअर मार्केटच्या नावाखाली सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. अलफाहाद आरिफ मोमिन, अजय पाटील उर्फ शिवप्रसाद मल्लिकार्जुन खुदासे, सूर्या उर्फ राहुलसिंग निर्मलसिंग कर्णावत आणि प्रेमशंकर बलदेव बैरागी ह्या चार आरोपींना सायबर पोलिसांनी सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. या चारही आरोपींनी मिळून फक्त दोन दिवसाच्या आत एका बँक खात्यामध्ये तीन कोटी २५ लाख रुपयांचा आर्थिक उलाढाल केल्याचे पोलीस तपासात  समोर आले आहे. 

Pimpri Chinchwad News
Maharashtra Rain : पुण्यासहित राज्यात तुफान पाऊस; पुढील ३-४ तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

चीन, सिंगापूर, दुबई कनेक्शन 

सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या चारही आरोपींनी मिळून वेगवेगळ्या बँक खात्याच्या सहाय्याने तसेच चीन, सिंगापूर आणि दुबई येथील काही आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com