Petrol Diesel: कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; 'या' ठिकाणी 84.10 रुपये पेट्रोल

देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घ्या
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price TodaySaam TV

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत कपातीचा ट्रेंड कायम आहे. मागील काही दिवसांत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर बुधवारी कच्च्या तेलाच्या दरात आणखी घसरण झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर कायम आहेत. क

गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel)दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी सरकारने तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला होता.यानंतर राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारांनीही व्हॅट कमी करून लोकांना दिलासा दिला.

हे देखील पाहा -

कच्च्या तेलाचे नवीनतम दर

जुलैच्या सुरुवातीला प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा घसरत आहेत. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल ९०.३९ डॉलर पर्यंत घसरली आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ९६.२५ डॉलर प्रति बॅरलवर घसरल्याचे दिसून आले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपयांची कपात करून राज्यातील जनतेला दिलासा दिला होता.

आजचे भाव काय आहेत?

– पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 आणि डिझेल डीजल 96.52 रुपये प्रति लिटर

– पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today
कोल्हापुरला पुन्हा पुराचा धोका; राधानगरीचा स्वयंचलित दरवाजा उघडला

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com