कोल्हापुरला पुन्हा पुराचा धोका; राधानगरीचा स्वयंचलित दरवाजा उघडला

पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८ फूट १० इंच झाली आहे.
Kolhapur Rain
Kolhapur Rain Saam Tv
Published On

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) पुन्हा मुसळधार पावसाने सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८ फूट १० इंच झाली आहे. त्यामुळे चिखली ता.करवीर येथील नागरिकांना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून स्थलांतरीत केले जात आहे.

आज पहाटे पाच वाजता राधानगरी धरणाचा ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. दरवाजातून १४२८ पॉवर हाऊसमधूनचा १६०० असा एकूण ३०२८ क्येसक विसर्ग सुरू आहे. (Kolhapur Rain Update)

Kolhapur Rain
swine flu | नागरिकांची चिंता वाढली! कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू

पंचगंगा नदीपात्राने काल इशारा पातळी गाठली. रात्री १० वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ ३९ फूट पाणी पातळी झाली होती. चिखली, आंबेवाडीतील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Kolhapur Rain
पाकव्याप्त काश्मीर भारताचाच होईल; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९८% भरले आहे. धरणांतून ३०२८ क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे, त्यामुळे स्थलांतरित होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८ फूट १० इंच झाली आहे. त्यामुळे चिखली ता.करवीर येथील नागरिकांना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून स्थलांतरीत केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com