'काँग्रेस, राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर, विश्वजीत कदमांनाचा पराभव झाला नसता'

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रोज लोक येत आहेत, दर गुरुवारी मुंबईमध्ये पक्षात अनेक लोक येत आहेत. त्यामुळे पक्ष आणखी वाढणार आणि बळकट होणार...'
'काँग्रेस, राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर, विश्वजीत कदमांनाचा पराभव झाला नसता'
'काँग्रेस, राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर, विश्वजीत कदमांनाचा पराभव झाला नसता'Saam TV
Published On

सांगली : राष्ट्रवादी (NCP) पक्षात रोज लोक येत आहेत, दर गुरुवारी मुंबईमध्ये पक्षात अनेक लोक येत आहेत. त्यामुळे पक्ष आणखी वाढणार आणि बळकट होणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. ते आज सांगलीमध्ये प्रजासत्ताक दिनी (Republic Day) बोलत होते.

सांगलीच्या कडेगावमध्ये मंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांना नगरपंचायत मध्ये पराभव पत्करावा लागला. यावर पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समजूतदार पणा दाखवला असता तर भाजप नगरपंचायत निवडणुकीत निवडून आले नसते. पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समजूतदारपणाने काम करेल असंही जयंत पाटील म्हणाले.

'काँग्रेस, राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर, विश्वजीत कदमांनाचा पराभव झाला नसता'
पवारसाहेब मलिकांना सांगा; 'आयटम गर्ल नको निदान आयटम बॉय तरी म्हणा'

तसेच जनतेची सत्ता, प्रजेची सत्ता अशी प्रजासत्ताक दिन साजरा होत असतो. भारतात लोकशाही अधिक प्रबळ व्हावी हाच सर्वांचा आशावाद आहे. भारतीय जनता नेहमी लोकशाहीवादी राहिली आहे असही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात कोरोनाशी (Corona) लढण्याची जय्यत तयारी आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंटचे प्रमाण कमी आहे. घरातच नागरीक औषध उपचार करत लढत आहेत. अजूनही आरोग्य यंत्रणेवर ताण नाही. ही लाट सर्वांच्या परिश्रम मधून ओसरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com