पवारसाहेब मलिकांना सांगा; 'आयटम गर्ल नको निदान आयटम बॉय तरी म्हणा'

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या आणि त्या फाईल्स तपासत असताना मंत्रालयातील एका फोटो व्हायरल झाला असून त्या फोटोने चांगलच राजकारणात तापलं आहे.
पवारसाहेब मलिकांना सांगा; 'आयटम गर्ल नको निदान आयटम बॉय तरी म्हणा'
पवारसाहेब मलिकांना सांगा; 'आयटम गर्ल नको निदान आयटम बॉय तरी म्हणा' Saam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : 'पवार साहेब त्या नवाब मलिकांना एवढं सांगा; 'आयटम गर्ल म्हणू नका; किमान आयटम बॉय तरी म्हणा.' असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या यांच्यावरती टीका करताना नवाब मलिकांनी 'सोमय्या हे भाजपची आयटम गर्ल' असल्याचं वक्तव्य केलं होत. त्यावरती सोमय्यांनी (Kirit Somaiya) प्रतिक्रिया दिली.

काय आहे प्रकरण-

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या आणि त्या फाईल्स तपासत असताना मंत्रालयातील एका फोटो व्हायरल झाला असून त्या फोटोने चांगलच राजकारणात तापलं आहे.

पवारसाहेब मलिकांना सांगा; 'आयटम गर्ल नको निदान आयटम बॉय तरी म्हणा'
Ajit Pawar: केंद्राच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष, त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत विचार होईल - अजित पवार

उद्धव ठाकरे खोटारडे आहेत -

दरम्यान, या सर्व प्रकरणावरती बोलताना सोमय्या म्हणाले, 'तो फोटो कुणी काढला? कुणी व्हायरल केला? हा गोंधळ सुरू आहे त्या ठिकाणी किरीट सोमय्या बसलेले आहेत. आणि दोन कर्मचारी आहेत. म्हणजे आमच्या तिघांपैकी तर कुणी फोटो काढलेला नाहीये. मी तर एकटाच होतो मग फोटो काढला कुणी, आणि व्हायरल केला कुणी? उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) माणसांनी काढला की आदित्य ठाकरेंच्या एजंटनी काढला की एकनाथ शिंदे यांच्या PA ने काढला की प्रताप सरनाईक? कुणी काढला फोटो ? किरीट सोमय्या खुर्चीवर बसले हा विषय नाही तर कुणाची खुर्ची धोक्यात आहे याचा तपास व्हायला हवं असं सोमय्या म्हणाले आहेत. तसंच, 'मला तर उद्धव ठाकरे मदत करत आहेत, फोटो व्हायरल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाला ना? असंही ते म्हणाले. मुद्दा असा आहे फाईलमध्ये काय होत तर 'उद्धव ठाकरे खोटारडे आहेत हे फाईलमध्ये होत.' असा घणाघातही त्यांनी मुख्यमंत्र्यावरती केला आहे.

हे देखील पहा -

मलिकांचा बोलवता धनी शरद पवार

मंत्रिमंडळाने प्रस्ताव प्रारीत करताना तीन कोटी 8 लाख रुपये बुडवले, चोरी पकडली गेली म्हणून हा फोटो व्हायरल (Viral Photo) झाला की काय मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आपण खंजीर, विश्वासघात करू शकतो याचे उदाहरण आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांनी घडवलं आता विश्वासघाती मुख्यमंत्र्यांना प्रत्येक क्षणी खुर्चीची चिंता आहे. की, माझ्या पाठीत आणखी कुणी तरी मग तो प्रताप सरनाईक आहे एकनाथ शिंदे आहे की अजित पवार (Pratap Saranaik, Eknath Shinde, Ajit Pawar) आहेत जे खंजीर खुपसणार नाही ना? अशी मुख्यमंत्र्यांना चिंता असल्याचही सोमय्या म्हणाले.

दरम्यान नवाब मलिक यांचा बोलवता धनी शरद पवार आहेत. इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. पवार साहेब त्या नवाब मलिकांना एवढं करी सांगा, 'आयटम गर्ल म्हणू नका किमान आयटम बॉय तरी म्हणा असंही सोमय्या म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com