Bhandara News: धावत्या बसमध्ये प्रवाशानं सोडला जीव; भोवळ आल्यावरच बस हॉस्पिटलला नेण्याची केली विनंती, पण कंडक्टर अडून बसला

Passenger Death In Running Bus: भंडारा जिल्ह्यात धावत्या बसमध्येच प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Passenger Death In Running Bus
Passenger Death In Running BusYandex

शुभम देशमुख, साम टीव्ही भंडारा

धावत्या बसमध्येच प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली (Passenger Death In Running Bus) आहे. विनंती करून देखील बस रूग्णालयात नेली नसल्याची माहिती मिळत आहे. गावकऱ्यांनी वाहन चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रवाशाला धावत्या बसमध्ये चक्कर आली होती. तो बेशुद्ध पडला होता. बस आगारात पोहोचल्यानंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं आहे.

गोंदिया-तुमसर-भंडारा या बसमध्ये देव्हाडी येथून एक प्रवासी बसमध्ये चढला होता. तुमसर शहराच्या वेशीवर त्याला भोवळ आली अन् तो बेशुद्ध पडला. त्याच्या दोन साथीदारांनी सदर बस (Bhandara News) रुग्णालयात नेण्याची विनंती बस वाहकाला केली. परंतु त्यांनी काहीही न ऐकता वाद घातला. बस थेट स्थानकात नेली. त्यानंतर सहकाऱ्यांनी बेशु्द्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला रूग्णालयात नेलं. तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.

या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी चालक आणि वाहकाच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. धावत्या बसमध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव चुनीलाल राऊत (३४) असे आहे. तो (Passenger Death) डोंगरला येथील रहिवासी आहे. आता याबसच्या चालक आणि वाहकावर कारवाईची मागणी केली जात आहे.

Passenger Death In Running Bus
Girl Death While Dancing: हळदीत नाचता नाचता तरूणीचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

गोंदिया-तुमसर भंडारा ही बसगाडी भंडारा आगाराची (Bhandara Bus) आहे. चालक आणि वाहकांना नेमकं काय घडलं? याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. याबाबत भंडारा आगाराच्या व्यवस्थापकांना संपूर्ण माहिती दिली आहे. योग्य कारवाई केली जाणार असल्याचं तुमसरच्या अगार व्यवस्थापक सारिका निमजे यांनी सांगितलं आहे. चुनीलाल राऊतचा मृत्यू वाहक आणि चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. गावकऱ्यांमध्ये देखील तणावाचं वातावरण आहे.

Passenger Death In Running Bus
Police Constable Death: चोरट्यांचा पाठलाग जीवघेणा ठरला; पाठीत विषारी इंजेक्शन खुपसलं, पोलीस जीवानिशी गेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com