कैलास चौधरी
उस्मानाबाद - नगरपालिकेच्या निष्क्रिय कर्मचाऱ्यांमुळे शहरातील कपिलधारा स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त Corona व्यक्तीच्या मृतदेहाची Deathbody अवहेलना झाल्याचा प्रकार काल घडला आहे. तब्बल दोन दास मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत स्मशानभूमीमध्ये तसाच पडून होता. कंत्राटदाराने ओली लाकडे पुरवल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचे मसनजोगी रामा गंदेलवाड यांनी सांगितले. कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी उस्मानाबाद Osmanabad नगरपालिकेकडे आहे. मंगळवारी कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कपिलधारा स्मशानभूमीत आणण्यात आले.
हे देखील पहा -
त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला अग्नि दिला आणि लगेच तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळात चिता विझली त्यामुळे तब्बल दोन तास हे मृतदेह स्मशान भूमीच्या लोखंडी संगड्यात तसेच पासून होते. शहरातील काही नागरिक तिथे गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचा त्यांनी व्हिडिओ काढला तसेच इतर लोकांनी डिझेल टाकून अर्धवट जळालेल्या मृतदेह पूर्णपणे दहन केला. तोपर्यंत सुमारे दोन तास मृतदेह तसाच अर्धवट जळालेल्या स्थितीत होता अशी माहिती समोर आली आहे.
Editded By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.