Ratnakar Gutte Pankaja Munde
Ratnakar Gutte Pankaja MundeSaam tv

Ratnakar Gutte News : तर पंकजा मुंडेंसाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ सोडेन; आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे

Parbhani News : पंकजा मुंडे यांना मी निवडणुकीत पाडेन. अशा पद्धतीचा अपप्रचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविषयी चालू आहे. पण मी पंकजा मुंडे यांचा आदर करत आहे
Published on

परभणी : पंकजा मुंडे जर गंगाखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असतील तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ (Pandhapur) त्यांच्यासाठी सोडण्यास तयार आहे. असे जाहीर वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. (Breaking Marathi News)

Ratnakar Gutte Pankaja Munde
Pandhrpur News : मनसेकडून पालकमंत्र्यांच्या फोटोला गोवऱ्यांचा हार; दूध दरवाढीसाठी आंदोलन

गंगाखेड तालुक्यातील माखणी येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, की भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे सांगत आहेत की पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मी निवडणुकीत पाडेन. अशा पद्धतीचा अपप्रचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविषयी चालू आहे. पण मी पंकजा मुंडे यांचा आदर करत आहे. त्यांनी जर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडेन. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ratnakar Gutte Pankaja Munde
Ratnakar Gutte News : तर पंकजा मुंडेंसाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ सोडेन; आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे

खोटा अपप्रचार करू नये 
ज्यावेळेस पंकजा मुंडे या विधानसभा निवडणुकीमध्ये पडल्या त्यावेळेस त्यांच्यासाठी आमदारकीचा जेलमधून राजीनामा देण्यासाठी तयार असणारा मी पहिला आमदार होतो. त्यावेळेस मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे देखील जाहीर केले होते. त्यामुळे माझ्याविषयी खोटा अपप्रचार करू नये. जो इमानदार असतो तो इमानदार असतो. साखर कारखान्याने ३३० कोटीचे कर्ज घेतले होते. त्या कर्जासाठी मी जेल देखील भोगली आणि ते कर्ज मी फेडले असेही आमदार गुट्टे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com