Pandhrpur News : मनसेकडून पालकमंत्र्यांच्या फोटोला गोवऱ्यांचा हार; दूध दरवाढीसाठी आंदोलन

Pandharpur News : गाईच्या दुधाला चाळीस रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये दर मिळावा
Pandhrpur News
Pandhrpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : राज्यभरात दूध दरवाढीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. अशातच आता मनसेनेही दूध दर वाढ आंदोलनात उडी घेतली आहे. दूध दरवाढीच्या मागणीसाठी (Pandharpur) पंढरपूर जवळच्या मोडनिंब येथे मनसेच्यावतीने (Radhakrishna Vikhe Patil) दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतीकात्मक फोटोला शेणाच्या गोवर्यांचा हार घालून आंदोलन केले. (Tajya Batmya)

Pandhrpur News
Online Fraud : लाइकचा टास्क पडला महागात; डॉक्टरांची १२ लाखात ऑनलाइन फसवणूक

दुधाच्या दरात (Milk Price) वाढ व्हावी यासाठी राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. गाईच्या दुधाला चाळीस रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांनी आज आंदोलन केले. या आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला गोवऱ्यांचा हार घालून निषेध केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandhrpur News
Pune Mumbai Expressway Block: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक; कारसाठी जुना महामार्ग पर्याय

शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले दूध 

मनसेने केलेल्या आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता. या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर दूध ओतले. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com