Parbhani News: मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, सेलू तालुक्यातील खळबळजनक घटना

35 Year Men Ended His Life For Maratha Reservation: परभणी जिल्ह्यातील देऊळगाव गात येथील शेतमजूराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
Parbhani Crime News: Youth Ended Life For Maratha Reservation At Deulgaon Ghat
Parbhani Crime News: Youth Ended Life For Maratha Reservation At Deulgaon GhatYandex

राजेश काटकर साम टीव्ही, परभणी

Maratha Reservation News

मराठा आरक्षणासाठी देऊळगाव गात (Deulgaon Ghat) येथील शेतमजूराने आत्महत्या (Youth End Life) केल्याची घटना घडली आहे. या तरूणाने त्याच्या शर्टने पळसाच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परभणी जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आजपर्यंत अनेक तरुणांनी आपलं जीवन संपवलं आहे. परभणी जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, या चिंतेत ३५ वर्षीय शेतमजूराने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथे लेंडी नदीच्या काठावर काल दुपारी म्हणजेच १६ एप्रिल रोजी घडली आहे. सदर प्रकरणी सेलू येथे अकस्मात मृत्यूची नोंद (Parbhani News) करण्यात आली.

Parbhani Crime News: Youth Ended Life For Maratha Reservation At Deulgaon Ghat
Husband End Life due to Wife : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून ३० वर्षीय पतीने जीवन संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

बाबासाहेब सिताराम गायकवाड, असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचं नाव आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत (Parbhani Crime News) नाही. स्वतःच्या मुलीस आरक्षण मिळत नाही. मराठा समाजाला आरक्षण ((Maratha AAarkshan) मिळेल का नाही, या चिंतेत गायकवाड होते, असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. सेलू पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यापूर्वीही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे अनेक तरूणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. परभणी जिल्ह्यात जानेवारी महिन्यामध्ये मराठा आरक्षण मिळावं, या मागणीसाठी एका ३४ वर्षीय (Youth End Life For Maratha Reservation) तरुणाने आत्महत्या केली होती. परभणी तालुक्यातील सनपुरी येथे ही घटना घडली होती. सचिन राम शिंदे असं या मृत युवकाचं नाव होतं. मयत तरुणाकडे मराठा आरक्षण मिळावं, अशा आशयाचा मजकूर लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली होती.

Parbhani Crime News: Youth Ended Life For Maratha Reservation At Deulgaon Ghat
Mumbai Police officer ends life : धक्कादायक! मुंबईत पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, पोलीस वसाहतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com