Accident News: रस्‍त्‍यावर उभ्‍या ट्रकला मागून धडक; पोलीस हवालदाराचा मृत्यू

रस्‍त्‍यावर उभ्‍या ट्रकला मागून धडक; पोलीस हवालदाराचा मृत्यू
Accident News
Accident NewsSaam tv

Parbhani News: रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागुन दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात (Accident) एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. सुधाकर रामकिशन कनके असे मयत असून सध्या परभणी येथील पोलीस हवालदाराचे नाव आहे. (Live Marathi News)

सदर अपघात मानवत येथे स्वामी समर्थ जिनिंगसमोर मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. पोलीस मुख्यालयाशी संलग्न सदर कर्मचारी मानवत येथील होते. मंगळवारी रात्री ते पोलीस स्थानकात कर्तव्यावर परभणीहून कामकाज करून दुचाकीने जात होते. मानवत येथे स्वामी समर्थ जिनिंग समोर उभ्‍या ट्रकला धडक दिली.

Accident News
Dhule News: पेंशन धारकांच्या मागण्यांसाठी रोखला मुंबई– आग्रा महामार्ग

रस्‍त्‍याच्‍या बाजूला उभ्‍या ट्रकला पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीची धडक बसली. अपघातात सुधाकर कनके यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सपोनि आनंद बनसोडे, पोना. फड पाथरी पोलीस ठाण्याचे सपोनि. बंदखडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर कनके यांचा मृतदेह रूग्‍णालयात नेण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com