Pankaja Munde: पंकजा मुंडेंचा पराभव, महायुतीतील 5 आमदारांना टेन्शन? विधानसभेत बीडचं गणित बिघडणार?

Loksabha Election Pankaja Munde: मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झालाय. बीडमध्ये महायुतीचे पाच आमदार आहेत. मात्र तरीही पंकजांचा पराभव झाल्याने आमदारांची धाकधूक वाढलीय. लोकसभेला महायुतीचा पराभव झाल्याने आगामी विधानसभेला बीडचं गणित काय असेल? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Pankaja Munde: पंकजा मुंडेंचा पराभव, महायुतीतील 5 आमदारांना टेंशन? विधानसभेत बीडचं गणित बिघडणार?
Pankaja MundeSaam Tv

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

बीडची ओळख मुंडेंचा बालेकिल्ला अशीच....पण यंदाच्या लोकसभा निवडणूकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडेंना बीडचा गड राखता आला नाही. बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने बीड जिल्ह्यातील महायुतीच्या पाचही आमदारांचं टेंशन वाढलंय. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर 2014मध्ये 6 पैकी भाजपचे 5 आमदार विजयी झाले. मात्र 2019 मध्ये चित्र बदललं. 6 पैकी केवळ 2 मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलं.

मुंडेंचा पराभव, महायुती आमदारांना टेन्शन

धनंजय मुंडेंच्या परळीत 74 हजार मतांनी आघाडी मिळाली असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत कमालीनं घडलीय.

अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंके यांच्या माजलगावमध्ये अवघी 975 मतांची आघाडी मिळालीय.

तर भाजपच्या लक्ष्मण पवारांच्या गेवराईत तब्बल 39 हजार मतांची पिछाडी आहे.

भाजपच्या नमिता मुंदडा यांच्या केजमध्ये 13 हजार मतांनी पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत.

अजित पवार गटाच्या बाळासाहेब आजबेंच्या आष्टीत तब्बल 32 हजार मतांची आघाडी मिळाली असली तरी ती गेल्यावेळच्या तुलनेत ती घटलीय.

त्यामुळे या सर्व महायुतीच्या पाचही आमदारांचं टेंशन वाढलंय. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बजरंग सोनवणेंना बीड विधानसभा मतदारसंघातून तब्बल 61 हजार मतांची आघाडी दिलीय. त्यामुळे त्यांचं वजन वाढलंय. मात्र महायुतीच्या सर्वच आमदारांना विधानसभेसाठी आतापासूनच खबरदारी घ्यावी लागणार आहे. अन्यथा लोकसभेचा फटका विधानसभेतही बसल्याशिवाय राहणार नाही.

Pankaja Munde: पंकजा मुंडेंचा पराभव, महायुतीतील 5 आमदारांना टेंशन? विधानसभेत बीडचं गणित बिघडणार?
NCP Mla Meeting: आमदार अजित पवारांची साथ सोडणार? भर बैठकीत आमदारांनी स्पष्टचं सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com