लाडक्या बहिणींनो कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा; भाजपच्या महिला मंत्र्याचा अजब सल्ला

Pankaja Munde Controversial Statement To Women Voters: नाशिकमधील सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महिलांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कुंभमेळा, विकास आणि महापौर पदावरून त्यांनी भाजपसाठी जोरदार आवाहन केले.
BJP leader and Union Minister Pankaja Munde addressing a public rally in Nashik ahead of civic elections.
BJP leader and Union Minister Pankaja Munde addressing a public rally in Nashik ahead of civic elections.Saam Tv
Published On

नाशिक ही महाराष्ट्राची देवभूमी असून याच पवित्र भूमीत देवाभाऊ आले, त्यांच्या हातात कमळ आहे, असे ठाम प्रतिपादन मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमध्ये केले. कमी वेळेत जास्त मुद्दे मांडण्याचा संघर्ष करावा लागत असल्याचे सांगत त्यांनी जोरदार भाषण केले.नाशिक ही रामाची व हनुमानाची जन्मभूमी असल्याचा उल्लेख करत पुढील काळात होणाऱ्या कुंभमेळ्याचा संदर्भ त्यांनी दिला. कुंभ म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर नाशिकच्या विकासाचा पाया आहे, असे त्या म्हणाल्या. मागील सिंहस्थ कुंभाच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर गिरीश महाजन पालकमंत्री होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

BJP leader and Union Minister Pankaja Munde addressing a public rally in Nashik ahead of civic elections.
Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांचं निलंबन; अमरावतीमधील राजकारणात मोठी खळबळ

कुंभमेळ्याचा मोठा ताण महापालिकेवर येणार असून त्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे महापौरही भाजपचाच असला पाहिजे, मोठा विकास होणार आहे, असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला. श्रीरामाच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे. नाशिकचं नाव शूर्पणखेचं नाक कापल्यावरून पडलं विकासाच्या आड येणारे विरोधक छाटायचे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपले असतील, तर महापौर का नको, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

BJP leader and Union Minister Pankaja Munde addressing a public rally in Nashik ahead of civic elections.
Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या

मतदारांना आवाहन करताना त्या म्हणाल्या, मतदानाच्या दिवशी लाडक्या बहिणींनो सकाळी उठा, देवपूजा करा, नाश्ता करून झाकून ठेवा. आधी कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा. काही सभा राहिल्याचे नमूद करत त्यांनी सर्वांनी 15 तारखेला आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com