रोज खा मटन अन् दाबा कमळाचे बटन, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारांना अजब सल्ला|VIDEO

Ashok Chavan Controversial Statement In Nanded Election: नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. “रोज खा मटन आणि दाबा कमळाचे बटन” या अजब वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नांदेड महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार आता रंगात आला. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला. नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिले. मात्र या प्रभागात शिवसेना आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम यांनी अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यावरुन शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाला. त्यावर बोट ठेऊन अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. प्रभाग तिन मध्ये काही उमेदवार जबरदस्तीने उभे केले, अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण, हेच कळायला मार्ग नाही.

शिवसेनेचे तीन आमदार अनाधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात. एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतो. नेमकं उमेदवार कोण हेच कळत नाही. आधी आम्हाला शिव्या घालत होते. आता एकमेकांना शिव्या देत आहेत, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली. तीन-तीन चार-चार आमदारांची भूमिका वेगळी असेल आणि असे उमेदवार तुम्ही निवडून दिले तर नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले.

रोज खा मटन आणि दाबा भाजपचे बटन असं अशोक चव्हाण म्हणाले. एकाचं मटन खाऊन दुसऱ्याला मतदान अशी भानगड करु नका, मी काही मटन देणार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. तुम्ही सगळ्यांचा अनुभव घेतला. सगळ्यात मोठा नगरसेवक अशोक चव्हाण तुमच्यासमोर उभा आहे. मला आणि माझ्या पक्षाला सत्ता द्या यांचे कान मी पकडू शकतो. तुमची कामे आमच्या नगरसेवकांनी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे.असेही अशोक चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com