काश्मीरला राहताेय असं वाटतयं; व्यापारी आक्रमक, दुकानं उघडली

pandharpur traders
pandharpur traders
Published On: 

पंढरपूर : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या राेखण्यासाठी तसेच साखळी ताेडण्यासाठी साेलापूर जिल्हा प्रशासनाने पंढरपूरसह करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यांमध्ये आजपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. या पाचही तालुक्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु राहणार आहेत. हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी गेले तीन दिवस पंढरपूरात व्यापा-यांचे तहसीलदार कार्यालयासमाेर आंदाेलन सुरु आहे. आम्ही कश्मिरमध्ये राहत असल्याचे वाटत आहे अशी भावना काही व्यावसायिकांनी व्यक्त केली.

स्थानिक प्रशासनाने व्यापा-यांची pandharpur traders भावना राज्य शासनास कळविल्या जातील असे गुरुवारी (ता.१२) नमूद करुन नियम पाळावेच लागतील असे स्पष्ट केले. गुरुवारी रात्री व्यापारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीत दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

pandharpur traders
नागपंचमीला कोरोनाचं ग्रहण; शिराळ्यात लक्ष ठेवणार ड्राेन

त्यानूसार आज (शुक्रवार) सकाळ पासून व्यापा-यांनी आपली दुकानं उघडली आहेत. प्रशासनाने कारवाई केली तरी आम्ही दुकानं बंद करणार नाही असा निर्धार व्यापा-यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान प्रशासन त्यांच्या भुमिकेवर ठाम असल्याने आम्ही देखील आमच्या निर्णयावर ठाम आहाेत. आम्ही दुकानं सुरु ठेवणार आहाेत. आम्हांला काेणत्या ही प्रकारची मुदत दिली नाही.

पंढरपूरकर काश्मिरमध्ये राहतात की काय अशी भावना नागरिकांमध्ये झाली आहे. संपुर्ण महाराष्ट्र सुरु असताना वारीच्या काळात पंढरपूर बंद ठेवण्यात आले. त्यामुळे माेठ्या प्रमाणात व्यापा-यांचे आर्थिक नुकसान झाले. प्रशासनाने शनिवार आणि रविवार या दाेन दिवशी दुकानं बंद ठेवावीत अन्य दिवशी सर्व दुकाने खूली करावीत या मागणीवर ठाम असल्याचे व्यापा-यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.