नागपंचमीला कोरोनाचं ग्रहण; शिराळ्यात लक्ष ठेवणार ड्राेन

nagpanchami
nagpanchami
Published On

सांगली : काेविड १९ च्या पार्श्वभुमीवर सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा shirala येथे यंदा देखील नागपंचमीच्या nagpanchami सणाच्या अनुषंगाने जिवंत नागाची पूजा करण्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार बंदी असणार आहे. यामुळे उद्या (शुक्रवार) साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीच्या nag panchami सणावर यंदा देखील गर्दी आणि पर्यावरणाच्या काळजीतून जिवंत नागपूजा रोखण्यासाठी वनविभागाने ‘ड्रोन कॅमेऱ्या’ drone camera च्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी सुमारे १६ पथकांची नियुक्ती केल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे sushan kale यांनी दिली.

बत्तीस शिराळा या गावात जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा हाेती. मात्र उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर ही परंपरा खंडित झालेली आहे. काेविड १९ च्या पार्श्वभुमीवर जगप्रसिध्द बत्तीस शिराळा येथे यंदाही सण साजरा करताना नियम व अटी लागू केल्या आहेत.

भाविकांसाठी येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिराचे दरवाजे बंद राहणार आहेत. परंतु पारंपरिक पूजेसह प्रतिकात्मक नागपूजा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. ही पूजा करताना गर्दी हाेणार नाही याची काळजी नागरिकांनी विशेषत: महिलांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून भागात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि काेविड १९ च्या नियमांबाबत ग्रामस्थांना सांगतिले जात आहे. गावात कोठेही सर्पाची हाताळणी अथवा प्रदर्शन करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी वन कर्मचारी, पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत.

उद्या (शुक्रवार) वन विभाग सहा फिरती आणि दहा गस्ती पथकांच्या माध्यमातून गावात लक्ष ठेवणार आहे. याबराेबरच दोन ड्रोन कॅमेऱ्याद्बारे संपूर्ण परिसरावर सूक्ष्म नजर ठेवण्यात येणार आहे. सहा छायाचित्रीकरण कॅमेरे, श्वान पथक देखील नियुक्त करण्यात आले आहे.

वन विभागाचे चार सहायक वनरक्षक दर्जाचे चार अधिकारी, १८ वनक्षेत्रपाल, ३० वनपाल , ५० वनरक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे काळे यांनी नमूद केले.

nagpanchami
कोरोनावरील औषध वर्षाअखेरीस येणार; शिराळ्यात निर्मीती

न्यायालयाच्या निर्णयाने परंपरा खंडीत

महाजन यांच्या पत्नीने नागाची पूजा करीत होते असे उत्तर दिले. गोरक्षनाथ यांनी महाजन यांच्या पत्नीस जिवंत नागाची पूजा कर असा सल्ला दिला. तेव्हापासून शिराळा येथे जिवतं नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली.

येथील नागपंचमीचा साेहळा पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशातून नागरिक येत होते. शिराळ्यात सर्व घरांमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती. ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयाने खंडित झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com