

पंढरपुर : रद्द करा रद्द करा संचार बंदी रद्द करा, आम्हांला लाॅकाडउन मान्य नाही अशा घाेषणांनी आज (गुरुवार) पंढरपूर शहरातील व्यापा-यांनी तहसील कार्यालय दणाणून साेडले. गेल्या दाेन दिवसांपासून संचार बंदीच्या निर्णयाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आज तिसऱ्या दिवशीही व्यापा-यांनी pandharpur traders protest मागणी मान्य हाेई पर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासनातील अधिका-यांनी व्यापा-यांची भेट घेवून राज्य शासनाकडे मागण्यांचे निवेदन पाठविले जाईल असे आश्वासन देण्यात आले.
पंढरपूरसह माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या तालुक्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढू हाेऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने १३ ऑगस्ट पासून अनिश्चित काळासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयास व्यापा-यांचा विराेध आहे. या निर्णया विराेधात गेले तीन दिवस पंढरपूर शहरातील व्यापारी व नागरिकांनी आंदाेलन छेडले आहे.
सततच्या लाॅकडाऊनमुळे शहरातील व्यापारी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता पुन्हा लाॅकडाउनची टांगती तलवार असल्याने याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
कडक निर्बंधांविषयी बुधवारी व्यापारी आणि महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये कोणताही ताेडगा अथवा निर्णय झाला नाही. त्यामुळे आज व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी आजही पंढरपूरातील आंदाेलन सुरुच ठेवले.
दरम्यान राज्यात रात्री दहा दुकाने सुरु ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. परंतु आपले पाच तालुके त्यामध्ये नसल्याने व्यापारी आक्रमक झाले हाेते. त्यांनी प्रशासनास तातडीने या पाच तालुक्यांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली. प्रशासनातील अधिका-यांनी शासनास निवेदन पाठविले जाईल असे नमूद केले.
पंढरपुरसह पाच तालुक्यांतील संचार बंदीच्या निर्णयावर राज्य शासन कशा पद्धतीने तोडगा काढणार याकडे साेलापूर जिल्ह्यातील नागरिकांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.