साेलापूर : येत्या १५ ऑगस्टला संपूर्ण भारत देश आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन independence day साजरा करणार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीसह vanchit bahujan aghadi एमआयएम MIM सारखे पक्ष देशाचं विभाजन करण्यासाठी उभे ठाकले असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे praniti shinde यांनी येथे केली.
काॅंग्रेसवासी यांनी अभिमानाने म्हटलं पाहिजे हम देश की वासी है. आम्ही सर्वधर्म समभाव या अनुषगांने वाटचाल सुरु ठेवली आहे असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.
साेलापूरात बुधवारी इलियास शेख यांच्या काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उदघाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार शिंदे यांनी इलियास शेख यांच्या कार्याचे काैतुक केले. तसेच विराेधकांचा खरपूस समाचार घेतला.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या काेणता ही पक्ष येताे आणि देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करताे. ज्या वेळीस भाजप पक्ष नव्हता त्यावेळी सर्व ठीक चालले हाेते. हा पक्ष आल्यानंतर छाेटे छाेटे पक्ष उदयास आले. जेव्हा सामान्य माणसाला गरज असते तेव्हा यापैकी कोणीच पुढे येत नाही आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हांच हे पक्ष गरीब मतदारांचा उपयोगी करून घेण्यासाठी येतात. हे पक्ष देशाचे विभाजन व्हावे यासाठीच उभे ठाकल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
यावेळी आमदार शिंदे यांनी काेराेना काळात पंतप्रधान नरेंद्र माेदींनी ताटं वाजविण्यास सांगतले त्यामुळे देशात अवदसा आली असेही म्हटले.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, "आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही नेते मंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना पहायला मिळतं आहेत. अशांचा ना कोणी बॉस आहे ना यांना काेणता विकासनिधी मिळतो. मात्र सोलापुरात काँग्रेसचा एकच 'वन मॅन शो' आहे. ते म्हणजे आपल्या सर्वांचे सुशीलकुमार शिंदे. आमदारांच्या वक्तव्यास उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन दाद दिली.
दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आमदार प्रणिती शिंदे या गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. त्या काॅंग्रेसचे विचार लाेकांमध्ये रुजवू लागल्या आहेत. तर विरोधकांवर जोरदार टीका करीत आहेत. त्यामुळे सोलापुरातील महापालिकेचे राजकारण आत्तापासूनच तापायला सुरुवात झाली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.