Pandharpur News: पंढरपूरमध्ये मृत्यूतांडव! कार आणि ट्रकचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

Pandharpur Accident News: अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी करमाळा पोलिस दाखल झाले. अपघातात श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार, जेमी कुनशामत, शारदा हिरेमठ अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam TV
Published On

Pandharpur:

पंढरपूरमधून अपघाताची मोठी घटना समोर आलीये. करमाळा जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात. कर्नाटकमधील गुलबर्गा येथील‌ चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. करमाळा - नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur News
Pandharpur: थंडी वाढली, पंढरपूरात हरभऱ्याची भाजी खाऊ लागली भाव; गाठला चिकनचा दर

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी करमाळा पोलीस दाखल झाले. अपघातात श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार, जेमी कुनशामत, शारदा हिरेमठ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. रस्ते अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. कालपासून राज्यात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत.

पुण्यात सोमवारी रात्री ११.३० सुमारास देखील भीषण अपघाताची घटना घडली होती. यामध्ये दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या अन २ जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक तरुण फूड डिलिव्हरीचे काम करत होता. अपघात झाला त्यावेळी देखील तो याच कामासाठी दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र वाटेत काळाने त्याच्यावर घाला घातला.

समृद्धी महामार्गावर देखील काल रात्री भीषण अपघात झाला. कारच्यासमोर अचानक रोही आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गाडीसमोर रोही आल्याने चालकाना गाडीचा अचानक ब्रेक मारला. मात्र त्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला जाऊन धडकली. गाडीचे दोन्ही टायर देखील फुटले. अपघातात कारमधील 7 जण जखमी झाले आहेत.

Pandharpur News
Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगूस; मध्यरात्री २०- २५ वाहनांची तोडफोड, परिसरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com