- चेतन व्यास
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील आठ पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत सभा घेण्यात आली. यावेळी अधिकार्यांसोबतच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. (wardha latest marathi news)
वर्धा (wardha) पंचायत समिती सभापती पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सेलू पंचायत समिती सभापती पदाकरिता सर्वसाधारण (महिला) (women), देवळी पंचायत समिती समिती सभापती पदाकरिता सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे. (Maharashtra News)
याबराेबरच हिंगणघाट पंचायत समिती सभापती पदाकरिता सर्वसाधारण, समुद्रपूर पंचायत समिती सभापती पदाकरिता अनुसूचित जाती (महिला), आर्वी पंचायत समिती सभापती पदाकरिता सर्वसाधारण (महिला) तसेच आष्टी पंचायत समिती सभापती पदाकरिता अनुसूचित जमाती आणि कारंजा पंचायत समिती सभापती पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.