Adani Group: राज्यातील शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे? महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप

Chandrapur News: चंद्रपुरातील शाळेचे व्यवस्थापन आता गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये.
राज्यातील शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे? महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप
Adani GroupSaam Tv
Published On

मुंबईतील धारावी विकास प्रकल्पावरुन विरोधकांनी अदानी उद्योग समुहाला टार्गेट केलंय. मुंबईत अदानींविरोधात मोर्चाही काढण्यात आला. आता सरकारच्या आणखी एका निर्णयावरुन विरोधकांनी सरकारला आणि अदानी समुहावर निशाणा साधलाय.

चंद्रपूरमधील शाळा शालेय शिक्षण विभागाकडून अदानी समूहाला हस्तांतरीत करण्यात आलीये. माउंट कार्मेल कॉन्हेंट उच्च माध्यमिक शाळेचे व्यवस्थापन आता अहमदाबादचे अदानी फाऊंडेशन बघणार आहे.

राज्यातील शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे? महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप
Shiv Sena Dasara Melava: उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...

स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर या शाळेला काही-अटी शर्थींसह हस्तांतरीत करण्यात आलंय. याबाबत राज्य शासनाने जीआर जारी केलाय. मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. तर देशाच व्यवस्थापनच सध्या अदानी चालवत आहेत, असं म्हणत संजय राऊत (sanjay raut) यांनी निशाणा साधलाय.

शाळेचा कारभार सरकारने अदानी समूहाकडे (adani group) देऊन महाराष्ट्र विक्रीला काढल्याची टीका होतेय. सगळ्याच क्षेत्रांवर अदानींचं नियंत्रण येत असून शिंदे सरकारचे (shinde government) हे पाप असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केलाय.

राज्यातील शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे? महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप
Shiv Sena Dasara Melava: उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...

शालेय विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश पुरविण्यात सरकार अपयशी ठरलंय. जे गणवेश दिलेत तेही माप न घेता निकृष्ट दिल्याचे प्रकार समोर आलेत. या ताज्या घटनांनी शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलेला असतानाच चंद्रपूरची शाळा हस्तांतरीत करण्याचा निर्णय वादात अडकलाय. या निर्णयामुळे राज्यातील इतर शाळांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षणाचं बाजारीकरण होण्याची भिती व्यक्त होतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com