Operation Tiger : त्या ६ खासदारांना Y+ सुरक्षा, ठाकरेसेना आक्रमक; बीड, परभणीसह राज्यभर बंडखोर खासदारांविरोधात आंदोलन | VIDEO

Uddhav Thackeray Shivsena Operation Tiger : उबाठातील ६ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर परभणी, बीड आणि वाशिममध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले असून बंडखोर खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे.
MAHARASHTRA POLITICAL TURMOIL: SIX UBT SHIV SENA MPS JOIN SHINDE CAMP, Y+ SECURITY DEPLOYED AMID STATEWIDE PROTESTS
MAHARASHTRA POLITICAL TURMOIL: SIX UBT SHIV SENA MPS JOIN SHINDE CAMP, Y+ SECURITY DEPLOYED AMID STATEWIDE PROTESTSsaam tv
Published On
Summary
  • उद्धव ठाकरेंच्या पक्षातील ६ खासदार फुटले

  • या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली

  • परभणी, बीड आणि वाशिममध्ये ठाकरे समर्थकांनी तीव्र आंदोलन केले

  • बंडखोर खासदारांना संभाव्य धोका लक्षात घेऊन Y+ सुरक्षा देण्यात आली

राज्यातील राजकारणात काल मोठा भूकंप झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ९ खासदारांपैकी ६ खासदारांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला. आज झालेल्या दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीला देखील हे ६ खासदार गैरहजर होते. या गटाफुटीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर मात्र संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांना कार्यकर्त्यांना फोडून काढण्याचे आदेश दिले आणि परभणी, वाशीम, बीडमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले. दरम्यान उबाठा सेनेतून फुटलेल्या त्या ६ खासदारांना आता 'Y Plus' सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं नवीन वळण घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर परभणी जिल्ह्यातील ठाकरे समर्थक शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सोनपेठ येथे शिवसैनिकांनी संजय जाधव यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत निषेध नोंदवला. तसेच त्यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी "उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" आणि "गद्दारांचा निषेध असो" अशा घोषणा देण्यात आल्या.

MAHARASHTRA POLITICAL TURMOIL: SIX UBT SHIV SENA MPS JOIN SHINDE CAMP, Y+ SECURITY DEPLOYED AMID STATEWIDE PROTESTS
Mumbai : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! दोन संशयितांच्या पॉलीग्राफ चाचणीला न्यायालयाची मंजुरी

बीडमध्येही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सहा खासदारांचे प्रतीकात्मक पुतळे जाळून संताप व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी संबंधित खासदारांविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत इशाराही दिला. वाशिममध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिमेला काळे फासून आणि जोडे मारून आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदारांच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.

दरम्यान या ६ खासदारांच्या सुरक्षिततेसाठी आता राज्य गुप्तचर विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन टायगरमध्ये नाव आलेल्या सर्व ६ खासदारांना तातडीने व्हाय प्लस सुरक्षा लागू करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या राहत्या घराबाहेर आणि त्यांच्यासोबत २४ तास पोलीस राहणार असल्याचे निर्देश दिले आहेत. खासदारांच्या या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते नवे वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com