महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन टायगर, ठाकरेंच्या या आमदाराला फोडणार, शिंदेंच्या नेत्यानं थेट नाव सांगितले

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे. प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Maharashtra Operation Tiger 2 political news
Maharashtra Operation Tiger 2 political newsSaam TV marathi (AI)
Published On

Maharashtra Operation Tiger 2 political news : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे लवकरच 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग ठरणार असल्याचा खळबळजनक दावा धाराशिवचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातील वादग्रस्त 'चिनी' सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून रंगलेल्या राजकीय कलगीतुऱ्यात सरनाईक यांनी कैलास पाटलांवर फिरकी घेत या नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.

तुळजापूर मंदिर परिसरात केंद्र सरकारची परवानगी नसलेले चिनी बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी लगावला. ते म्हणाले की, "कैलास पाटील हे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असा बनाव करत आहेत. पण त्यांनी उपस्थित केलेल्या त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आता त्यांच्या हालचालींवर, ते कुठे जातात आणि काय करतात यावर बारीक लक्ष ठेवले जाईल. याच माहितीच्या आधारे आम्ही 'ऑपरेशन टायगर २' यशस्वी करू."

Maharashtra Operation Tiger 2 political news
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात! ट्रॅव्हल्सच्या धडकेत ३ शाळकरी मुलींचा शाळेबाहेर मृत्यू; महाराष्ट्रावर शोककळा

नेमकं प्रकरण काय आहे?

धाराशिवमधील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग असल्याचा दावा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तुळजापूर येथे केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवण्यात आल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, "कैलास पाटील हे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असे आरोप करत आहेत; मात्र ते स्वतः 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग आहेत." पुढे मिश्किल टोला लगावत सरनाईक म्हणाले की, "त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कैलास पाटील कुठे जातात, घरी कधी जातात आणि तुळजापूरला कधी जातात, यावर नजर ठेवली जाईल. याच माहितीच्या आधारे आम्ही 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करू."

Maharashtra Operation Tiger 2 political news
महानगर गॅसचा ग्राहकांना मोठा इशारा! व्हॉट्सॲपवर आलेली 'ही' फाईल चुकूनही डाऊनलोड करू नका

शरद पवारांच्या पत्रातील दाव्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा दुजोरा

पिंपरी-चिंचवडमधील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे उद्योजक त्रस्त झाले असल्याची वस्तुस्थिती मान्य करत, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रातील दाव्याला दुजोरा दिला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी (उद्या) स्वतः उद्योजकांशी थेट संवाद साधणार आहेत. या बैठकीनंतर उद्योजकांना नक्कीच दिलासादायक मार्ग मिळेल, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला. धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com