ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

Omraje Nimbalkar Meeting With Uddhav Thackeray Latest Update: राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट! ऑपरेशन टायगर फेल ठरणार का? धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवला असून मातोश्रीवर भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Omraje Nimbalkar likely to meet Uddhav Thackeray at Matoshree amid rising political speculation in Maharashtra.
Omraje Nimbalkar likely to meet Uddhav Thackeray at Matoshree amid rising political speculation in Maharashtra.saam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून उद्धव ठाकरे यांचे 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका सुरुवातीपासून तळ्यात मळ्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यावर ते मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. आता या सर्व नाट्यमय घडामोडींमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे निरोप पाठवला असून सोमवारी भेटायला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान मध्यरात्री देखील आमदार कैलास पाटील आणि वरून सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असून पुणे येथील निवासस्थानी ही भेट झाली. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन खूप मोठे आहे. जे कोणी मोठ्या मनाने पक्षात येऊ इच्छितात त्यांचे स्वागत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मी अजून कोणत्याही पक्षात गेलो नाही असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, परवा झालेल्या बैठकीला ते आले होते आणि ते आम्हा सर्वांना दिसले आहे. जर कोणाला परत यायचं असेल तर येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com